शहरं
Join us  
Trending Stories
1
Pope Francis: पोप फ्रान्सिस यांचं निधन, दीर्घ आजारपणानंतर व्हॅटिकन सिटी येथे घेतला अखेरचा श्वास
2
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
3
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
4
WhatsApp वर चुकूनही असे फोटो डाउनलोड करू नका; तुमचे बँक खाते होईल रिकामे
5
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
6
८ दिवसांपासून शेअर विक्रीसाठी रांग, सातत्यानं लागतंय लोअर सर्किट; गुंतवणूकदारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ
7
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
8
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
9
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
10
"माझे सगळे कपडे फेकून दिले आणि...", १८व्या वर्षी उषा नाडकर्णींना आईने काढलेलं घराबाहेर
11
भारी! बालपणीच्या सुंदर आठवणींना नवा साज देणारी 'आई'; खेळण्यांपासून बनवते अप्रतिम फर्निचर
12
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
13
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
14
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
15
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
16
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
17
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
18
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
19
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...

लोकसंख्या वाढीचा वेग घटला, उपाययोजनांना यश : आठ वर्षांत अडीच लाख लोकसंख्या वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:04 IST

कोल्हापूर : गेल्या ५८ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये २५ लाख ३७ हजार ३९९ इतकी वाढ झाली आहे. मात्र, २00१ ते २0११ या दहा वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीचा जो वेग होता तो पुढच्या आठ वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामध्ये आजरा तालुका, पन्हाळा आणि मलकापूरमध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी घटत चालल्याचे, तर ...

कोल्हापूर : गेल्या ५८ वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये २५ लाख ३७ हजार ३९९ इतकी वाढ झाली आहे. मात्र, २00१ ते २0११ या दहा वर्षांमध्ये लोकसंख्यावाढीचा जो वेग होता तो पुढच्या आठ वर्षांमध्ये लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यामध्ये आजरा तालुका, पन्हाळा आणि मलकापूरमध्ये लोकसंख्या वाढण्याऐवजी घटत चालल्याचे, तर करवीर, हातकणंगले तालुक्यांमध्ये लोकसंख्येची वाढ होताना दिसत आहे.जागतिक लोकसंख्या दिन ११ जुलैला साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्णाच्या आकडेवारीची माहिती घेतली असता अनेक बाबी समोर आल्या आहेत. कोल्हापूर शहराचा समावेश करवीर तालुक्यामध्ये असल्याने साहजिकच जिल्ह्णात सर्वाधिक लोकसंख्या या तालुक्याची आहे.करवीर तालुक्याची २०११ ची लोकसंख्या १० लाख ३७ हजार असून, त्यामध्ये कोल्हापूर शहराच्या साडेपाच लाख लोकसंख्येचा समावेश आहे.मात्र, कोल्हापूर शहरासह करवीर तालुका हा २0१८ च्या आकडेवारीनुसार ११ लाख ३३ हजार ६२६ वर पोहोचला असून, गेल्या आठ वर्षांत शहर आणि तालुका मिळून ९६ हजारांनी लोकसंख्या वाढली आहे.करवीर, हातकणंगले, शिरोळमध्ये मोठी वाढ (नगरपालिका वगळून)२0११ ची लोकसंख्या आणि २0१८ चा विचार करता करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यांतील लोकसंख्येमध्ये भरीव वाढ होताना दिसत आहे. करवीरची ५४८१३, हातकणंगले ४८00२ आणि शिरोळ १८५८0 इतकी लोकसंख्या गेल्या आठ वर्षांमध्ये वाढली आहे.शहरांपेक्षा ग्रामीण लोकसंख्येत वाढगडहिंग्लज, इचलकरंजी, वडगाव, कागल, मुरगूड, पन्हाळा, मलकापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड या नऊ नगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या आठ वर्षांत ३८६८५ इतकी लोकसंख्या वाढली असून, याउलट बाराही तालुक्यांची लोकसंख्या १ लाख ७८ हजार ८४८ ने वाढली आहे.