शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2020 : ऑडिओच्या मदतीने त्या अंध विद्यार्थ्यांनी मिळविले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:17 IST

राजोपाध्येनगर येथील अंधांनी अंध विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या अंध युवक मंचच्या वसतिगृहातील पाचही अंध विद्यार्थ्यांनी ब्रेल आणि ऑडिओच्या मदतीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत लखलखीत यश मिळविले. संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. लोकमतच्या वृत्तामुळे त्यांना आपल्या घरी जाता आले.

ठळक मुद्देऑडिओच्या मदतीने त्या अंध विद्यार्थ्यांनी मिळविले यशदहावीच्या परिक्षेत शंभर टक्के निकाल : अंध युवक मंचच्या वसतिगृहाचे यश

कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील अंधांनी अंध विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या अंध युवक मंचच्या वसतिगृहातील पाचही अंध विद्यार्थ्यांनी ब्रेल आणि ऑडिओच्या मदतीने इयत्ता दहावीच्या परिक्षेत लखलखीत यश मिळविले. संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील दोन अंध विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. लोकमतच्या वृत्तामुळे त्यांना आपल्या घरी जाता आले.कोल्हापूरातील विकास विद्यामंदिर या शाळेत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ब्रेल आणि ऑडिओ स्वरुपात अभ्यास करुन सामान्य विद्यार्थ्यांसोबत परिक्षेला बसून हे यश मिळविले. लेखनिक म्हणून पद्मश्री ग. गो. जाधव शाळेच्या विद्यार्थ्यांनी पेपर लिहून सहकार्य केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक भाटे, तसेच विकास विद्यामंदिरचे मुख्याध्यापिका के. जी. आवळे, विशेष शिक्षक अजय वणकुद्रे, अंध युवक मंचचे अध्यक्ष संजय ढेंगे, सुबराव शिंदे यांनी सहकार्य केले.हिंगोली जिल्ह्यातील अतुल विश्वनाथ भगत याने ७१ टक्के तर कामिनी ज्ञानेश्वर गडवे हिने ६५ टक्के गुण मिळविले. मूळचे हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या कामिनीचे वडील शेतमजूर असून अतुलचे वडील मुंबईत रोजगार करतात. याशिवाय या वसतिगृहातील कोल्हापूर जिल्ह्यातील अमोल मोहन निकम याने ६४ तर हरिष दत्तात्रय सुकनपल्ली याने ६३ टक्के गुण मिळविले.आमदार ऋतुराज पाटील यांनी केली होती मदततब्बल तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर संचारबंदीमध्ये कोल्हापूरात अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील या दोन अंध विद्यार्थ्यांची त्यांच्या घरच्यांची भेट झाली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेउन आमदार ऋतुराज पाटील आणि डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्नीकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या प्रयत्नांने या विद्यार्थ्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुखरुप पोहोचवण्यात आले होते. या मदतीमुळे त्यांनी आभार मानले आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkolhapurकोल्हापूरDivyangदिव्यांग