शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अपंग विद्यार्थ्यांचे अनुदान अडले

By admin | Updated: March 13, 2015 23:56 IST

सत्तावीस लाख उपलब्ध : जिल्हा परिषदेत अनुदान पडून; संस्थाचालक आंदोलनाच्या पवित्र्यात

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरे, अंध, मुक्या अशा अपंग विद्यार्थ्यांचे शिक्षण, भोजन, गणवेश, औषधे, शालेय साहित्य, इमारत भाडे यांच्यासाठी शासनाकडून आलेले वेतनेतर २६ लाख ९६ हजारांचे अनुदान जिल्हा परिषदेत पडून आहे. अनुदानाची रक्कम संबंधित संस्थांना देण्यास समाजकल्याण प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे जिल्हा अपंग शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवक संघ आणि संस्थाचालक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.जिल्ह्यात अंध, मतिमंद, कर्णबधिर मुलांना शिक्षण देणाऱ्या १५ शाळा आहेत. सर्व शाळा विविध स्वयंसेवी संस्था चालवितात. शासनाचे समाजकल्याण विभाग दहा महिन्यांसाठी प्रत्येक मुलास दरमहा ९०० रुपयांप्रमाणे अनुदान देते. त्यातून विद्यार्थ्यास भोजन, शिक्षण, गणवेश व अन्य सुविधा दिल्या जातात. अ‍ॅडव्हान्स म्हणून ६० टक्के आणि नंतर ४० टक्के अनुदान दिले जाते. जिल्ह्यासाठी १ एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ अखेर यंदाच्या अ‍ॅडव्हान्सपोटी ६० टक्के प्रमाण बहिऱ्या व मुक्या मुलांसाठी १९ लाख ४५ हजार, अंध मुलांसाठी १ लाख ८३ हजार, मतिमंद मुलांसाठी ५ लाख ६८ लाख रुपये अनुदान आले आहे. हे अनुदान चार महिन्यांपूर्वी आले आहे. ३१ मार्चपूर्वी संबंधित संस्थांना देणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण प्रशासन शाळांचे मूल्यमापन केल्यानंतर अनुदान दिले जाईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनुदान अडले आहे. वेगवेगळी कारणे सांगत प्रशासन अनुदान देण्याचे टाळत आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील जिल्हा परिषदेने संस्थांना अनुदान दिले आहे. परंतु, येथील जिल्हा परिषदने अनुदान अडवून ठेवल्याने संस्थाचालकांनी एकत्र येऊन आवाज उठविण्याची तयारी केली आहे. ६०० मुलांना झळगडहिंग्लज - ३, कागल - १, शिरोळ - २, हातकणगंले - ३, करवीर - ६ अशा जिल्ह्यांत एकूण१५ संस्था आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे २०० जण कार्यरत आहेत. अनुदान न मिळाल्याने ६०० विद्यार्थ्यांना झळ बसत आहे.शासनाकडून आलेले वेतनेतर अनुदान जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने चार महिन्यांपासून अडविले आहे. मार्चअखेर संस्थांना अनुदान न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. - रघुनाथ मेतके, अध्यक्ष, अपंग शाळा संस्थाचालक संघटना शासनाकडून अनुदान आले आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत. यातूनही मार्ग काढण्यासाठी अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. -सुंदरसिंह वसावे, समाजकल्याण अधिकारी