शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘किफ’चा आजपासून प्रारंभ सुभाष घई उद्घाटक : सुमित्रा भावे यांना पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:12 IST

कोल्हापूर : सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३० वाजता होणाºया उद्घाटन समारंभात कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार

ठळक मुद्देकोल्हापूर वस्तुसंग्रहालयाने ही दुर्मीळ छायाचित्रे या प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिली भारतीय चित्रपट महामंडळामार्फत या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोल्हापुरात

कोल्हापूर : सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास आज, गुरुवारपासून सुरुवात होत आहे. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३० वाजता होणाºया उद्घाटन समारंभात कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे.दि. १४ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान शाहू स्मारक भवनातील तीन चित्रगृहांत देश-विदेशातील विविध ७० चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.प्रतिवर्षीप्रमाणे कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळामार्फत या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोल्हापुरात घेण्यात येणार आहे. यंदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त ‘कासव’ या चित्रपटाच्या लेखिका-दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना उद्घाटक सुभाष घई यांच्या हस्ते कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, संयोजक दिलीप बापट, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघनाथ राजेभोसले, सचिव रणजित जाधव, संचालक सतीश बिडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटनभारतीय चित्रपट व्यवसायाच्या शतकपूर्तीनिमित्त प्रथमच कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाच्या सहकार्याने महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या चित्रपटांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. त्याचे उद्घाटन सायंकाळी सुभाष घई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वस्तुसंग्रहालयाचे सहायक अभिरक्षक अमृत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाने ही दुर्मीळ छायाचित्रे या प्रदर्शनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. कोल्हापूर चित्रपट निर्मितीतील महत्त्वाचे योगदान देणाºया व्यक्तींच्या नामफलकांचे शोधन संकलन भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राच्या शोध विभागाद्वारे उपलब्ध झाले आहेत.