शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
4
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
5
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
6
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
7
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
8
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
9
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
10
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
11
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
12
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
13
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
14
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
15
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
16
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
17
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
18
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
19
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
20
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा

स्टडी रूमलाही ‘वेटिंग’

By admin | Updated: January 9, 2015 00:06 IST

स्पर्धा परीक्षांचा परिणाम : शहरातील वाचनालये बनली अभ्यासाची केंद्रे

संदीप खवळे - कोल्हापूर -स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरातील ग्रंथालयांच्या अभ्यासिका हाऊसफुल्ल झाल्या आहेत. शेकडो विद्यार्थी ग्रंथालयांत जागा मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत़ महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव ग्रंथालयाच्या राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये अभ्यासिकेत प्रवेश मिळण्यासाठी सुमारे सहाशे अर्ज आले आहेत. वाढत्या प्रतिसादामुळे शहरातील खासगी क्लासेसमध्ये तर वेटिंग लिस्टच तयार करण्यात आली आहे़ राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांतील दुर्गम गावांपासून शहर व उपनगरांतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या जोरदार तयारीला लागलेले आहेत़ अभ्यासिकेत प्रवेश घेण्यासाठी मुलींच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे़ सकाळी सातपासून रात्री आठपर्यंत ग्रंथालयांत विद्यार्थी अभ्यास व वाचन करतात. काही खासगी क्लासेसनी नाईट लायब्ररीचीही सोय केली आहे़ भास्करराव जाधव गं्रथालय येथे सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा केंद्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ केवळ सातशे रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना वर्षभर स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणारी विविध पुस्तके आणि अभ्यासिकेची सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे़ वाढती स्पर्धा, प्रथितयश अधिकाऱ्यांची प्रेरणादायी व्याख्याने यांचा परिपाक म्हणून गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढत आहे़ राज्य सेवा, पीएसआय, एसटीआय तसेच बँकिंग या क्षेत्रांतील परीक्षांना विद्यार्थ्यांची पसंती आहे़ विशेष म्हणजे वाचनालयातील मुलींची संख्या लक्षणीय आहे़स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शहरात काम करणाऱ्या खासगी क्लासेसनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररींची सुविधा केली आहे़ अगदी कॉर्पोरेट आॅफिसच्या धर्तीवर या वाचनालयांची रचना करण्यात आली आहे़ जेवण आणि चहापानासाठी लागणारा वेळ यांचा अपवाद वगळता तासन्तास विद्यार्थी शहरातील वाचनालयात अभ्यास करताना दिसतात़फेसबुक आणि व्हॉट्स अ‍ॅप, चित्रपट, सण यांना कोसो दूर ठेवून अधिकारी व्हायचेच या ध्यासाने पछाडलेली मुले-मुली शहरातील ग्रंथालयात कैक तास झिजत आहेत़ त्यामुळे अधिकारी होण्याच्या का निमित्ताने असेना, शहरातील अभ्यासिकांत गर्दी होत आहे़राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा केंद्रांतर्गत सातशे रुपयांत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सुरुवात करण्यात आली आहे़ या अभ्यासिकेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे़ अभ्यासिकेत प्रवेश मिळविण्यासाठी आतापर्यंत सहाशे उमेदवारांनी नोंद केली आहे़ यामध्ये मुलींची संख्या सुमारे साठ टक्के आहे़ - समीर म्हाब्री, गं्रथपाल, भास्करराव जाधव वाचनालय, कोल्हापूर गर्दीची कारणे काय..?स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची किंमत जास्त असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ही पुस्तके घेणे परवडत नाही़ सगळ्यांना खासगी क्लासेसची फी परवडत नाही़ ही बाब ओळखून महापालिकेच्या पुढाकाराने भास्करराव जाधव वाचनालयात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासिका करण्यात आली आहे़ अवघ्या सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या अभ्यासिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे़ सकाळी आठपासून सायंकाळी सातपर्यंत मुले-मुली इथे अभ्यास करीत असतात़ विद्यार्थ्यांचा वाढता कल पाहून लाखो रुपयांची पुस्तके महापालिकेने या वाचनालयास उपलब्ध करून दिली असल्याची माहिती गं्रथपाल समीर म्हाब्री यांनी दिली़