शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना महिनाभरापासून जेवण नाही, टाकाळा परिसरातील वसतिगृहाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 12:32 IST

कोल्हापूर येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना महिनाभरापासून जेवण नाही, टाकाळा परिसरातील वसतिगृहाची दुरवस्थाउच्च शिक्षण विभागाच्या वसतिगृहाला प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका

कोल्हापूर : येथील टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी असलेल्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वसतिगृहाची दुरवस्था झाली आहे. भोजनगृह बंद असून, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहाचा आधार आहे. सध्या येथे सुमारे ४० विद्यार्थी राहतात. गेल्या महिन्याभरापासून या वसतिगृहातील भोजनगृह बंद आहे; त्यामुळे स्वयंपाकघर धुळीने माखले आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी आणि स्वच्छतागृहामध्ये अस्वच्छता पसरली आहे.

भोजनगृह बंद असल्याने येथे जेवण मिळत नाही. त्याबाबत प्रशासनाने पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने बाहेरील काहीतरी खाऊन पोट भरावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. या गैरसोईमुळे होणाऱ्या त्रासाची कल्पना वसतिगृहाच्या प्रशासनाला दिली; मात्र त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांतून होत आहे.

सहसंचालकांनी लक्ष द्यावेवसतिगृहाशी संबंधित विविध समस्यांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्याचा मोठा त्रास होत आहे. परीक्षा तोंडावर आलेल्या असताना अभ्यास करायचा की, या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करायचा, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी वसतिगृहातील दुरवस्थेकडे लक्ष द्यावे. आमच्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

कार्यालयीन कामानिमित्त मी सध्या मुंबईला आलो आहे. या वसतिगृहातील अधीक्षकांना विद्यार्थ्यांच्या जेवणाबाबतची समस्या तातडीने सोडविण्याबाबतची सूचना दूरध्वनीवरून केली आहे. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याबाबतची पुढील कार्यवाही करणार आहे.- डॉ. अजय साळी

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर