शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांना सुवर्णकप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:40 IST

डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी मित्सुबिशी इलेक्ट्रिकल सुवर्णकप जिंकून एक लाखाच्या बक्षिसासह मेडल्स आणि जपान दौऱ्याचा मान मिळविला आहे. स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांतील १३५ प्रकल्पांमधून

इचलकरंजी : डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी मित्सुबिशी इलेक्ट्रिकल सुवर्णकप जिंकून एक लाखाच्या बक्षिसासह मेडल्स आणि जपान दौऱ्याचा मान मिळविला आहे. स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यांतील १३५ प्रकल्पांमधून उत्कृष्ट ३५ प्रकल्प अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. या सर्व स्पर्धकांवर मात करत ‘डीकेटीई’च्या स्पार्क संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.

मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया आणि मानव रचना शैक्षणिक संस्थेच्या विद्यमाने ही स्पर्धा फरिदाबाद (हरियाणा) येथे भरविण्यात आली होती. स्पर्धेत ‘डीकेटीई’च्या इलेक्ट्रॉनिक्समधील अथर्व पळसुले, प्रतीक खोंद्रे व समीक्षा पोतदार या विद्यार्थ्यांनी टीम स्पार्क नावाने सहभाग नोंदविला. ‘इंटेलिजन्ट आॅटोनॉमस रोबोट’ प्रकल्प बनविला. हा रोबोट सध्याच्या उद्योगधंद्यातील आॅटोमेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असून, वेळेची बचत आणि उत्पादनवाढीसाठी याचा खूप उपयोग होतो. विद्यार्थ्यांना प्रा. विनोद कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेच्या बक्षीस समारंभावेळी एआयसीटीईचे व्हा. चेअरमन डॉ. एम. पुनिया व मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाचे मुख्य संचालक कात्सुनोरी उशीकु, मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन जपानचे मासानोरी तानीमोती उपस्थित होते.

या नावीन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी अ‍ॅटोमेशन लॅबोलेटरीद्वारे विद्यार्थ्यांना अशाप्रकारे यंत्रणा कार्यान्वित करण्याचे ज्ञान ‘डीकेटीई’मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे, अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पत्रकारांना दिली. विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होण्यासाठी ‘डीकेटीई’मध्ये पीएलसी, एचएमआय, स्कॅँडा ट्रेनिंगचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकाविण्यास फायदा होत आहे, असे प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी सांगितले. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ. यु. जे. पाटील, एल. एस. आडमुठे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.फरिदाबाद (हरियाणा) येथील मित्सुबिशी इलेक्ट्रिक कप २०१९ स्पर्धेत इचलकरंजी डीकेटीईच्या विजेत्या संघास कात्सुनोरी उशीकु यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय