शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची फरफट

By admin | Updated: May 26, 2016 23:58 IST

हलकर्णी परिसर : महाविद्यालयीन शिक्षणासाठी गाठावे लागतंय गडहिंग्लज; वेळ, पैसा खर्च

एम. ए. शिंदे -- हलकर्णी --हलकर्णी हे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वभागातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र आहे. येथे पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. परिसरात तीन कनिष्ठ महाविद्यालये आहेत. बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी गडहिंग्लज गाठावे लागत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा खर्च होत असून, संपूर्ण दिवस जाण्या-येण्यामध्येच जात आहे. त्याचा त्यांच्या अभ्यासावर व आरोग्यावर परिणाम होत आहे. हलकर्णीत वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले तरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक फरफट थांबणार आहे.बारावीचा निकाल नुकताच लागला आहे. हलकर्णी परिसरातील हलकर्णी भाग ज्युनिअर कॉलेज, हलकर्णी येथून १५० विद्यार्थी उत्तीर्ण, हिडदुगी कनिष्ठ महाविद्यालय, हिडदुगी येथून १९ विद्यार्थी, ए. आर. देसाई कॉलेज तेरणी येथून ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर परिसरातून वेगवेगळ्या शाखांतून २१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रके मिळाल्यानंतर प्रवेश कोठे घ्यायचा, हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. गडहिंग्लजला जाऊन शिक्षण घ्यायचे म्हटले, तर ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. परिणामी मुलींचे शिक्षण खंडित होणार आहे. गोरगरीब आणि मोलमजुरीवर संसाराचा गाडा हाकणाऱ्या पालकांसमोर दुष्काळी परिस्थितीत मुलांच्या बसपाससाठी पैसे कोठून उपलब्ध करावयाचे ही मोठी समस्या आहे.सध्या हलकर्णीसह बसर्गे, येणेचवंडी, चंदनकूड, इदरगुच्ची, तेरणी, कळविकट्टी, कुंबळहाळ, मनवाड, नरेवाडी, नंदनवाड, खणदाळ, नांगनूर, कडलगे, अरळगुंडी येथील सर्व विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी गडहिंग्लजलाच ये-जा करीत आहेत.तेरणी, इदरगुच्ची, बसर्गे या गावांतून मुक्कामाच्या गाड्या आहेत. या गाड्या बेरडवाडीमार्गे गडहिंग्लजला जातात. कॉलेज विद्यार्थ्यांमुळे पहिली ६.३० ची गाडी ‘हाऊसफुल्ल’ असते. साडेसहाची गाडी चुकली की, सव्वा सातपर्यंत बसथांब्यावर तिष्ठत उभे राहावे लागते.गडहिंग्लज बसस्थानकात एसटी बस पोहोचण्यासाठी जवळपास एक तास लागतो. तेथून महाविद्यालयापर्यंत पायपीट करावी लागते. त्यामुळे किमान पहिल्या तासाला विद्यार्थ्यांना मुकावे लागते. विद्यार्थ्यांनी एस.टी.चा सवलतीचा पास काढायचा म्हटले, तरी प्रत्येकवेळी किमान ४०० रुपये मोजावे लागतात.