शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी नाहीच, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 15:22 IST

विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थितीची खरी, अचूक माहिती मिळावी या उद्देशाने बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्याची सरकार, शिक्षण विभागाची सूचना आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची काही महाविद्यालये वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये हजेरीसाठी बायोमेट्रिकचा वापर केला जात नाही. केवळ प्राध्यापक, कर्मचाºयांसाठी ही प्रणाली वापरली जात आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी नाहीचशिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील स्थितीप्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक

संतोष मिठारीकोल्हापूर : विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थितीची खरी, अचूक माहिती मिळावी या उद्देशाने बायोमेट्रिक प्रणालीचा अवलंब करण्याची सरकार, शिक्षण विभागाची सूचना आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची काही महाविद्यालये वगळता अन्य अभ्यासक्रमांच्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये हजेरीसाठी बायोमेट्रिकचा वापर केला जात नाही. केवळ प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी ही प्रणाली वापरली जात आहे.विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सवलती, शिष्यवृत्तीचे लाभ विद्यार्थ्यांना मिळतात. अशा विद्यार्थ्यांची विद्यापीठ, महाविद्यालयांमधील खरी अनुपस्थिती समजावी. परीक्षा देण्यासाठी किमान ७५ टक्के हजेरी असणे विद्यापीठाकडून बंधनकारक आहे.

सध्या बहुतांश महाविद्यालयांत तासिकानिहाय विद्यार्थ्यांची हजेरी प्राध्यापक नोंद करून घेतात. काही महाविद्यालयांमध्ये हजेरीच्या यादीवर विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. या प्रक्रियेमध्ये अनेकदा फेरफार होण्याची अधिकतर शक्यता असते.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीची खरी आणि अचूक माहिती मिळावी यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्याची सूचना सरकारने केली आहे; पण अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची काही महाविद्यालये वगळता बहुतांश महाविद्यालयांमध्ये संबंधित प्रणाली वापरली जात नाही. हजेरीतील फेरफार आणि हस्तक्षेप टाळण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिकचा वापर होणे आवश्यक आहे.विद्यापीठातील तीन विभागांतच सुविधाशिवाजी विद्यापीठ परिसरात विविध अभ्यासक्रमांचे ३९ अधिविभाग आहेत. भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान अधिविभागांत विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिकद्वारे घेतली जाते. अन्य विभागांत पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविली जाते.

जादा विद्यार्थिसंख्येची अडचणविविध व्यावसायिक अभ्याक्रमांना विद्यार्थिसंख्या मर्यादित असते. त्यामुळे त्यांना बायोमेट्रिकचा अवलंब करणे शक्य आहे. मात्र, कला, वाणिज्य, विज्ञान अभ्यासक्रमांच्या ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिसंख्या किमान दोन हजारांच्या पुढे असते, त्यांना या प्रणालीचा अवलंब करणे अडचणीचे ठरत आहे.

 

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत बायोमेट्रिक प्रणाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या हजेरीबाबत संबंधित सुविधा नाही. कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक बंधनकारक आहे; पण पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही प्रणाली वापरावी, असे शासनाला अपेक्षित आहे. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक असल्याची माहिती महाविद्यालयांनी आमच्या कार्यालयाला कळविली आहे.- डॉ. अजय साळी, शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील आकडेवारी

  1.  एकूण महाविद्यालये : २८३
  2. प्राध्यापकांची संख्या : ७७१७
  3. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या : ६६५७
  4. विद्यार्थिसंख्या : २,५५,७५६

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर