शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

शिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेचा विद्यार्थी राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 14:48 IST

महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च प्राथमिक (इ. पाचवी स्तर) शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरचा विद्यार्थी पीयूष सचिन कुंभारने ९७.९७३ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. यासह महानगरपालिकेच्या दहा विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देशिष्यवृत्ती परीक्षेत महानगरपालिकेचा विद्यार्थी राज्यात प्रथमपीयूष कुंभारचे यश : दहा विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च प्राथमिक (इ. पाचवी स्तर) शाळा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृ. जरग विद्यामंदिरचा विद्यार्थी पीयूष सचिन कुंभारने ९७.९७३ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. यासह महानगरपालिकेच्या दहा विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या शाळेतील शैक्षणिक दर्जा सिद्ध केला आहे. यासह जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये महानगरपालिकेच्या ३३ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश मिळविले आहे. पीयूषच्या यशाबद्दल मान्यवरांनी शाळेत जाऊन त्याचा सत्कार केला.

यशस्वी विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव, उपसभापती सचिन पाटील, शिक्षण समितीचे सदस्य संजय मोहिते, श्रावण फडतारे, सुनील पाटील, रूपाराणी निकम, मेहजबीन सुभेदार, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, प्रशासनाधिकारी शंकर यादव, प्राथमिक शिक्षण समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेले विद्यार्थीपीयूष सचिन कुंभार (प्रथम, म्युनि. लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), प्रसन्ना जनार्दन ओंकार (पाचवा, नेहरूनगर विद्यामंदिर), श्रद्धा गणपत सुतार (पाचवा, म्युनि. लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर), सार्थक सुभाष माने (दहावा, नेहरूनगर विद्यामंदिर), साची सचिन शिंदे (बारावी), आत्रेय राजेश शेेंडे (बारावा), शार्दूल रघुनाथ कांबळे (पंधरावा), शरयू मनोहर शिंगाडे, ऋषिकेश किशोर पाटील, सुमेध सच्चिदानंद जिल्हेदार (तिघेपण राज्यात अठरावे) हे सर्व विद्यार्थी म्युनि. श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचे आहेत.

पीयूष पहिल्यापासूनच अव्वलपीयूषचे वडील सचिन कुंभार व आई पुष्पा कुंभार हे दोघेपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. पीयूष पहिलीपासूनच महानगरपालिकेच्या जरगनगर विद्यालयात शिक्षण घेत आहे. पहिल्यापासून तो विविध स्पर्धा परीक्षांना बसत होता. त्यामुळे त्याला विविध स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी आत्मविश्वास वाढला होता. सकाळी व सायंकाळी अशा दोन सत्रांत तो अभ्यास करत होता. यासह तो स्केटिंग आणि स्विमिंग स्पर्धेतही अव्वल आहे. त्याला शाळेचे मुख्याध्यापक उत्तम गुरव, शिक्षक सुनील पाटील, संतोष कांबळे, युवराज एरुडकर, जोतिबा जाधव, स्वाती ढोबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

आई - वडील व वर्गशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळविले आहे. मनावर कोणतेही दडपण घेता मी या परीक्षेला सामोरा गेलो होतो.- पीयूष कुंभार

प्राथमिक शिक्षण समिती व महानगरपालिकेच्या शाळांनी केलेल्या विशेष उपक्रम राबविलेने महानगरपालिकेच्या शाळेकडे विद्यार्थी आकर्षित होऊ लागले आहेत. युनिट टेस्ट, सराव चाचण्या, शिष्यवृत्तीविषयक सहा दिवसांचे मार्गदर्शन शिबिर, जादा तास, शाळा स्तरावर शिष्यवृत्ती धर्तीवर मॉडेल पेपरचा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतल्याने विद्यार्थ्यांना हे यश मिळविणे शक्य झाले आहे.शंकर यादव,प्रशासनाधिकारी

चौथीची परीक्षा संपल्यानंतर शाळेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी सुरू केली जाते. वर्षभराचे आमचे वेळापत्रक तयार केले जाते. एक दिवसही सुट्टी न घेता आमचे शिक्षक अध्यापनाचे काम करतात. सर्वांनी एकत्र घेतलेल्या परिश्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळेच हे यश मिळाले आहे.उत्तम गुरव,मुख्याध्यापक, श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर 

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीkolhapurकोल्हापूर