शहरं
Join us  
Trending Stories
1
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
2
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
3
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
4
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
5
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
6
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
7
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
8
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
9
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
10
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
11
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
12
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
13
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
14
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
15
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
16
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
17
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
18
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
19
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
20
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग

विद्यार्थिनीची गळफासाने आत्महत्या

By admin | Updated: December 29, 2014 00:10 IST

प्रेमप्रकरणातून शक्यता : शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहातील घटना

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक तीनमध्ये आज, रविवारी एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया कृष्णा पाटील (वय २४, रा. रिळे-बत्तीस शिराळा, जि. सांगली) असे तिचे नाव आहे. या प्रकाराची राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आत्महत्येच्या प्रकारामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : सुप्रिया विद्यापीठातील रसायनशास्त्र विद्याशाखेत ‘अप्लाईड केमिस्ट्री’ या विषयाच्या द्वितीय वर्षात शिकत होती. आज दुपारी वसतिगृहातील मेसमधून जेवून ती आपल्या ७५ क्रमांकाच्या खोलीमध्ये गेली. त्यानंतर तिची मैत्रीण वर्षा पाटील सायंकाळी सहा वाजता तिला भेटण्यासाठी आली. यावेळी खोलीचा दरवाजा बंद होता. तिने दरवाजा उघडण्यासाठी तिला हाक मारली; पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर काही विद्यार्थिनी जमल्या. त्यांनी तिला पुन्हा हाक मारली; पण आतून काहीच आवाज न आल्याने याबाबत वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाला माहिती दिली.त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या माध्यमातून पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी येऊन खोलीचा दरवाजा तोडला असता, सुप्रियाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. शांत व मनमिळावू स्वभावाच्या सुप्रियाने आत्महत्या केल्याचे समजताच वसतिगृह परिसरात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गर्दी केली. वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, आदी अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. वसतिगृहाबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याने याठिकाणी पोलीस व विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मृत सुप्रिया हिच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.मैत्रिणीला धक्कागेल्या आठ दिवसांपासून सुप्रिया एकटीच रूममध्ये होती. तिच्या रूममधील इतर मैत्रिणी गावी गेल्या आहेत. आजच सकाळी मैत्रीण वर्षा पाटील ही आली होती. सुप्रियाने आत्महत्या केल्याचे समजताच मानसिक धक्का बसून ती बेशुद्ध पडली. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिसऱ्यांदा प्रकारविद्यापीठात यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात मुलांच्या वसतिगृहामध्ये एकाने विष पिऊन, तर आणखी एकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता; परंतु प्रशासन व इतर विद्यार्थ्यांच्या जागरूकतेमुळे त्यांचे प्राण वाचले; पण मुलींच्या वसतिगृहातील ही पहिलीच घटना आहे. (प्रतिनिधी)