शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:34 IST

नूल : युतीचे सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. विरोधक केवळ शासनविरोधात अपप्रचार करीत आहेत. विद्यार्थी हितासाठीच शासनाने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नूल येथे केली.नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक ...

नूल : युतीचे सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे आहे. विरोधक केवळ शासनविरोधात अपप्रचार करीत आहेत. विद्यार्थी हितासाठीच शासनाने नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी अपघात योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची त्वरीत अंमलबजावणी केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नूल येथे केली.नूल (ता. गडहिंग्लज) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदिरादेवी जाधव आर्टस्, कॉमर्स व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन वास्तू उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. आमदार संध्यादेवी कुपेकर, दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, श्री भगवानगिरी महाराज, सरपंच बाजीराव चव्हाण, कल्लाप्पाण्णा नडगदल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री पाटील म्हणाले, नूल गावच्या विकासकामांची यादी करून वर्षभरात कामे मार्गी लावली जातील. गावासाठी बहुउद्देशीय सभागृह बांधून देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. संपादक जाधव, अ‍ॅड. शिंदे, आमदार कुपेकर यांचीही भाषणे झाली.मंत्री तावडे यांच्याहस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन तर संजय थोरात लिखीत ‘विद्या दानीश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते झाले. मंत्री तावडे यांचा संस्था सचिव नानाप्पा माळगी यांच्याहस्ते सत्कार झाला. जयसिंग चव्हाण, विनोद नाईकवाडी, अभिजित चौगुले, कार्यकारी अभियंता एन. एम. वेदपाठक, संजय थोरात आदींसह संचालकांचा मंत्र्यांच्याहस्ते सत्कार झाला. यावेळी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, किसनराव कुराडे, अ‍ॅड. हेमंत कोलेकर, योगेश जाधव, जि. प. सदस्या अनिता चौगुले, सभापती जयश्री तेली, प्रांताधिकारी संगीता चौगुले, आदी उपस्थित होते.अपघाती मृत्यू झाल्यास मोफत शिक्षणनव्या अपघात योजनेत प्रती विद्यार्थी दहा रुपये शासन विमा कंपनीकडे भरेल. विद्यार्थी अपघातात जखमी झाल्यास संपूर्ण वैद्यकीय खर्च तर पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा शासनाने निर्णय घेतल्याची माहितीही तावडेंनी यावेळी दिली.