शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

बेकायदेशीर गॅस भरणाऱ्यास अटक

By admin | Updated: December 11, 2014 00:32 IST

साळोखेनगरमधील घटना : २६ हजार किमतीचे ४९ गॅस सिलिंडर जप्त

कोल्हापूर : साळोखेनगर-भारतनगर येथील ओढ्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या तरुणास आज, बुधवारी दुपारी राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. संशयित आरोपी यल्लाप्पा सत्याप्पा कोळी (वय २७, रा. साळोखे पार्क ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २६ हजार किमतीच्या ४९ गॅस सिलिंडर टाक्या, वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार, आदी मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, साळोखे पार्कमध्ये यल्लाप्पा कोळी हा लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशाप्रकारे बेकायदेशीरपणे घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने भरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे राजू वरक, दत्तात्रय माळवी, मिलिंद नलवडे, अरुण खोत, गौरव चौगुले, आदींनी त्या ठिकाणी छापा टाकला असता कोळी हा गॅस भरून वाहनधारकांना देत असताना रंगेहात मिळून आला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजेंद्रनगरमध्ये बेकायदेशीर गॅस भरणाऱ्या गणेश मस्के व सागर कांबळे या दोघांना दहशतवादी विरोधी पथकाने छापा टाकून अटक केली होती. यामुळे राजेंद्रनगर व साळोखे पार्क परिसरात मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)