शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

कोल्हापुरातील एसटी कार्यशाळेचे स्थलांतर, नवे ठिकाण तापदायक

By पोपट केशव पवार | Updated: June 18, 2024 16:07 IST

ताराबाई पार्कात कार्यशाळा गोकुळ शिरगावला हलविली

पोपट पवारकोल्हापूर : गेल्या ६१ वर्षांपासून कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्कात आरटीओ कार्यालयाशेजारी कार्यरत असलेले एस.टी.महामंडळाचे वर्कशॉप गोकुळ शिरगाव येथील महामंडळाच्या जागेत पंधरा दिवसांपूर्वी हलविण्यात आले आहे. मात्र, नव्या जागेत मुलभूत सुविधांची वानवा असताना महामंडळाने घेतलेला हा तडकाफडकी निर्णय कर्मचाऱ्यांसाठी तापदायक ठरू लागला आहे. नव्या ठिकाणी पुरेशे पाणीही मिळत नसून याबाबत आवाज काढला तरी कर्मचाऱ्यांवर कारवाईची भीती दाखवली जात आहे. त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. कोल्हापुरातील ताराबाई पार्कात ३ मार्च १९६३ मध्ये एस.टी.महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेची उभारणी करण्यात आली. या वर्कशॉपमध्ये परिवहन महामंडळाच्या बसेसची देखभाल, दुरुस्ती करण्यात येते. यासाठी ३०० कर्मचारी कार्यरत होते.मात्र, हे वर्कशॉप महामंडळाच्या गोकुळ शिरगाव येथील जागेत नुकतेच स्थलांतरित करण्यात आले. नव्या ठिकाणी मुलभूत सुविधा नसताना ते स्थलांतरित करण्याची इतकी घाईगडबड का केली, फॅक्टरी इनस्पेक्शन होण्याआधीच वर्कशॉप का हलविले असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.घरभाडे भत्त्यातही नुकसानताराबाई पार्कात असलेल्या वर्कशॉपमध्ये ३०० कर्मचारी कार्यरत होते. येथे या कर्मचाऱ्यांना शहरीप्रमाणे १६ टक्के घरभाडे भत्ता मिळत होता. मात्र, वर्कशॉप स्थलांतरित केल्याने या भत्त्यात ८ टक्क्यांनी कपात केली आहे. एका कर्मचाऱ्याचे दोन ते पाच हजार रुपयांचे नुकसान होणार आहे. हे वर्कशॉप स्थलांतरित करताना कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा कुठलाही विचार गृहित धरलेला नाही. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

महामंडळाच्या दुर्लक्षपणामुळे जागा गेलीएस.टी.महामंडळाची गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील २५ टक्के जागा केवळ महामंडळाच्या दुर्लक्षामुळे खासगी मालकांनी बळकावली असून महामंडळाला जाग आल्यानंतर त्यांनी येथे वर्कशॉप बांधले असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांतून होत आहे.कर्मचाऱ्यांवर दबावहे वर्कशॉप का स्थलांतरित केले याबाबत वरिष्ठांना विचारण्याचीही कर्मचाऱ्यांना सोय राहिलेली नाही. नव्या ठिकाणी होणाऱ्या गैरसोयीबाबत विचारणा केल्यास थेट कारवाईची धमकी दिली जात आहे. त्यामुळे कर्मचारी मानसिक तणावात असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

वर्कशॉप स्थलांतरित करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच घेतला हाेता. त्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून गोकुळ शिरगावमध्ये वर्कशॉप इमारतीचे काम सुरु होते. हे काम पूर्ण झाल्याने वर्कशॉप स्थलांतरित केले आहे. वर्कशॉपसाठी नवी इमारत मिळाल्याने एस.टी. महामंडळ व कर्मचाऱ्यांची सोयच झाली आहे. - यशवंत कानतोडे, यंत्र अभियंता,एस.टी.महामंडळ, वर्कशॉप

टॅग्स :kolhapurकोल्हापूर