शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खंडपीठासाठी संघर्ष सुरूच राहणार

By admin | Updated: April 23, 2016 01:45 IST

वार्षिक सभेत निर्णय : बार असोसिएशनची निवडणूक होणारच, बिनविरोधचा प्रस्ताव फेटाळला

कोल्हापूर : खंडपीठासाठी सहा जिल्ह्यांची एकजूट कायम आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत संघर्ष कायम राहील, असा निर्धार कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत शुक्रवारी व्यक्त केला. खंडपीठासाठी आंदोलन सुरू असल्यामुळे असोसियशनच्या निवडी बिनविरोध कराव्यात व अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांना अध्यक्ष करावे, ही अ‍ॅड. माणिक मुळीक यांची मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे बार असोसिएशनची निवडणूक होणारच हे स्पष्ट झाले. न्याय संकुलातील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात असोसिएशनची वार्षिक सभा झाली. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण तर, उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, सचिव रवींद्र जानकर प्रमुख उपस्थित होते. त्यात अध्यक्ष चव्हाण यांनी खंडपीठासाठी कार्यकारिणीने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. खंडपीठासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या जिल्ह्यांची एकजूट आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत लढा कायम ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.उपाध्यक्ष चिटणीस म्हणाले, ‘खंडपीठासाठी न्याय मिळेपर्यंत संघर्ष केला जाईल. सचिव जानकर यांनी खर्चाचा तपशील सादर करून पदाधिकारी निवडीचा ठराव मांडला. त्यावर अ‍ॅड. माणिक मुळीक यांनी खंडपीठासाठीचा लढा लक्षात घेता पदाधिकारी निवड प्रक्रिया बिनविरोध करावी, अ‍ॅड.शिवाजीराव राणे यांची अध्यक्षपदी निवड करावी, असे सूचविल; परंतु अ‍ॅड. किरण पाटील यांनी पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली. त्याला सभासदांनी पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणूक घेण्याचे ठरले. अ‍ॅड. सुशीला कदम, धनश्री चव्हाण, विठोबा जाधव, सचिन मेंडके, मिलिंद जोशी, सुस्मित कामत, विजय ताटे-देशमुख, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वर्गणी भरण्यासाठी सोमवारपर्यंत मुदतवार्षिक वर्गणी भरलेले सभासद हे निवडणुकीत मतदान करण्यास पात्र ठरणार आहेत. त्यामुळे सोमवार (दि. २५) पर्यंत दुपारी तीन वाजता वर्गणी भरण्याची मुदत सभेत निश्चित करण्यात आली. यादिवशी सायंकाळी पाच वाजता मतदारांची कच्ची यादी प्रसिद्ध केली जाणार असून, शनिवारी (दि. ३०) निवडणूक होण्याची शक्यता आहे.सुभाष पिसाळ निवडणूक अधिकारीया निवडणूकीसाठी अ‍ॅड. सुभाष पिसाळ यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.