शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

अपेक्षापूर्तीसाठी सचोटीने प्रयत्न

By admin | Updated: February 26, 2015 00:47 IST

एन. जे. पवार : नॅक ‘अ’ मानांकन ही पोचपावती

कोल्हापूर : पहिल्यांदा संवाद, मग चर्चा व गरज पडली, तर मुत्सद्दीपणाचा वापर या त्रिसूत्रीने शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून कारकीर्द पूर्ण केली. विद्यापीठाशी संबंधित प्रत्येक घटकाच्या अपेक्षापूर्तीसाठी सचोटीने व प्रामाणिकपणे प्रयत्न केला. विद्यापीठातील निखळ शैक्षणिक वातावरण, ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन ही माझ्या कामाची पोचपावती मानतो. सूडबुद्धी टाळून संयमाने काम केल्यानेच प्रत्येक टप्प्यावर यशस्वी ठरल्याचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी बुधवारी येथे सांगितले.डॉ. पवार यांची कुलगुरूपदाची मुदत बुधवारी संपली. त्यानिमित्त त्यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, कुलगुरुपदी निवड झाल्यानंतर अनेकांनी विद्यापीठाबाबत भीती घातली. येथील संघटना भक्कम असून त्यांच्यासमवेत काम करणे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. पण त्यावर डगमगून गेलो नाही. या विद्यापीठातील वातावरण बदलण्याच्या निर्धाराने काम सुरू केले. पहिल्या सहा महिन्यांत अधिकारी, सेवकांची रिक्त पदे भरून प्रशासकीय व्यवस्था भक्कम व शिस्तबद्ध केली. व्यवस्थापन, कामात गडबड होण्यापूर्वी संबंधित घटकांशी संवाद साधल्याने त्यांनी सहकार्य केले. त्यामुळे मार्ग सुकर झाले. (प्रतिनिधी) सकारात्मक भूमिकेने चांगले काम करता आलेकुलगुरू म्हणून काम करण्याची पहिलीच वेळ होती. माध्यमांनी विद्यापीठातील चुका दाखवून चांगल्याचे कौतुक केले. त्यांच्या अधिकतर सकारात्मक भूमिकेमुळे मला चांगले काम करता आले. शिवाय बळ मिळाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.चटके बसल्याने शिकलोमला १९७२ च्या दुष्काळाचे चटके बसल्याने शिक्षणात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुलगुरुपदापर्यंत पोहोचलो. दुष्काळाची जाणीव असल्याने या भागाशी कायम संवाद ठेवतो. आटपाडी, खानापूरसाठी गतवर्षी ‘एनएसएस’च्या माध्यमातून ‘एक पेंढी’ अभियान राबविले. त्याला विद्यापीठाच्या घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ती कायमची आठवण असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.