शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीस टक्के घरफाळा वाढीला तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:06 IST

इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अपिलीय समितीने घेतलेल्या २० टक्के घरफाळा वाढ कायम करण्याच्या निर्णयाला विविध स्तरांतून तीव्र विरोध केला जात आहे

ठळक मुद्दे ‘इनामं’चे उपहासात्मक आंदोलन : इचलकरंजीत ‘माकप’कडून पदाधिकारी धारेवरनागरिक मंचने फटाके वाजवून व साखर वाटून उपहासात्मक निषेध नोंदविला.

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या अपिलीय समितीने घेतलेल्या २० टक्के घरफाळा वाढ कायम करण्याच्या निर्णयाला विविध स्तरांतून तीव्र विरोध केला जात आहे. गुरुवारी ‘माकप’च्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अलका स्वामी यांना निवेदन देऊन वाढीव घरफाळा रद्द करण्याची मागणी केली. यावेळी शिष्टमंडळाने पदाधिकाºयांना धारेवर धरले. याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास नगरसेवकांच्या घरांवर मोर्चे काढण्याबरोबरच मंगळवारी (दि. १९) होणाºया पालिका सभेत घुसण्याचा इशारा दिला. यावेळी उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. तर इचलकरंजी नागरिक मंचने फटाके वाजवून व साखर वाटून उपहासात्मक निषेध नोंदविला. तसेच अन्यायी दरवाढ रद्द करावी, अशा घोषणा दिल्या.त्यावर घरफाळा वाढीला आमचाही विरोध आहे; पण सरसकट घरफाळा वाढ रद्द करण्याचा अधिकार अपिलीय समितीला नाही. याबाबत पालिका सभेत चर्चा केली जाईल. अपिलीय समितीचे अध्यक्ष तथा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना भेटून घरफाळा वाढीच्या विरोधातील तीव्रता सांगण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षा स्वामी यांनी यावेळी दिले.प्रांताधिकारी शिंगटे यांच्या अध्यक्षतेखालील अपिलीय समितीने २0 टक्के घरफाळा वाढ कायम करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे घरफाळावाढीच्या विरोधात नागरिकांतून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘माकप’च्या शिष्टमंडळाने गुरुवारी पालिकेत येऊन या निर्णयाच्या विरोधात आक्रमक शब्दांत भूमिका मांडली. प्राचार्य ए. बी. पाटील यांनी घरफाळा वाढीचा निर्णय कायद्याला धरून नसल्याचे सांगितले.पदाधिकारी जनतेच्या बाजूने की विरोधातपालिकेचे पदाधिकारी जनतेच्याच बाजूने आहेत की विरोधात आहेत, असा सवाल करीत शिष्टमंडळातील सदस्यांनी संताप व्यक्त केला. सध्या शहरात मंदीचे वातावरण असून, नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे २0 टक्के घरफाळा वाढ रद्द करावी, अशी मागणी केली. प्रशासनाकडून मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांच्यासह ‘राष्टÑवादी’चे पक्षप्रतोद अशोक जांभळे, ‘भाजप’चे पक्षप्रतोद तानाजी पोवार, ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद सागर यांनी घरफाळा वाढीबाबतची भूमिका स्पष्ट केली. घरफाळा वाढीला आमचाही विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.