शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

Strike of government employees: कोल्हापुरात कचरा उठाव ठप्प, महापालिकेत शुकशुकाट

By भारत चव्हाण | Updated: March 14, 2023 16:58 IST

जे कर्मचारी २००५ नंतर भरती झाले आहेत, आणि ज्यांना जुनी पेन्शन लागू नाही असे सर्व कर्मचारी, अधिकारीही संपात सहभागी

कोल्हापूर : जुनी पेन्शन सुरु करावी या मागणीसाठी राज्यभरात सुरु झालेल्या सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात कोल्हापूर महानगरपालिकेचे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी सहभागी झाल्यामुळे मंगळवारी शहरात कचरा उठावाचे काम ठप्प झाले, तर पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयासह मुख्य प्रशासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांअभावी शुकशुकाट पसरला होता. प्रशासनाने, विभाग प्रमुखांना सोबत घेऊन कामकाज करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अडचणी अनेक आल्याने कामकाजावर परिणाम जाणवला.राज्यभरातील सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत, या संपात कोल्हापूर महापालिकेचेही कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. सोमवारी रात्री प्रशासनातर्फे उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी एक परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊ नये, विभाग प्रमुखांनी कार्यालयात उपस्थित राहून कामकाज सुरु करण्याचे आवाहन केले होते. तसेच कार्यालय उघडणे व बंद करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. परंतु या परिपत्रकाकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही.पालिकेचे सर्व कर्मचारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर जमले. त्याठिकाणी कर्मचारी संघाचे पदाधिकारी विजय वणकुद्रे, दिनकर आवळे, अजित तिवले, काका चरापले यांनी संपाची माहिती दिली. थोडा वेळ घाेषणा दिल्या. त्यानंतर सर्व कर्मचारी मोर्चाने टाऊन हॉल उद्यानाकडे गेले. तेथून ते मुख्य मोर्चात सहभागी झाले. जे कर्मचारी २००५ नंतर भरती झाले आहेत, आणि ज्यांना जुनी पेन्शन लागू नाही असे सर्व कर्मचारी, अधिकारीही संपात सहभागी झाले आहेत. ज्यांना जुनी पेन्शन लागू आहे असेही कर्मचारी संपात सहभागी झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकारPensionनिवृत्ती वेतन