शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोल्हापुरात कडक निर्बंध, जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना 'ही' कागदपत्रे बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 18:30 IST

जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट तसेच कोरोनाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे.

कोल्हापूर : कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण सापडू लागल्याने सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कर्नाटक राज्य शासनाने खबरदारी म्हणून सीमा तपासणी पथके सज्ज केली आहेत. यानंतर आता कोल्हापूरचे प्रशासनही सतर्क झाले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट तसेच कोरोनाचे दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र बंधनकारक राहणार आहे.कोविड- 19 प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी आदेश बाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.सद्यस्थितीत कोल्हापुरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नाही. तर उपचारातील रुग्ण संख्या देखील ५० च्या खाली येवून पोहचली आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. आज पासून महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्या विरोधात कारवाईची मोहिम देखील सुरु केली आहे.कोल्हापुरात कडक निर्बंध करण्याआधीच कर्नाटक प्रशासनाने सीमेवर टोलनाक्यावर तपासणी नाके उभा केले आहेत. तपासणीनंतर प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. यात सीमाभागातील नागरिक तसेच कर्नाटक राज्याबाहेर पुढील राज्यांना जाणाऱ्या प्रवाशांना सवलत देण्यात आली आहे.आजरा, गडहिंग्लज, चंदगडकराना सवलतकोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तालुक्यांना जाण्यासाठी कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गावरूनच प्रवास करावा लागतो. आरटीपीसीआर सक्तीमुळे या तालुक्यातील प्रवाशांच्या जिल्ह्यांतर्गत प्रवासावरच निर्बंध आले होते. परंतु या प्रवाशांच्या रहिवासी पुराव्यांची खातरजमा करून त्यांच्या प्रवासास सवलत देण्यात आल्याने त्यांची गैरसोय टळली आहे.

कोल्हापूर प्रवेशासाठी हे आहेत नियम...- व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण म्हणजेे लसीचा दुसरा डोस होऊन १४ दिवस झाले असतील तर- १० वर्षाखालील व्यक्तींचा वयाचा पुरावा- वैद्यकीय कारणास्तव लस घेतली नसेल तर नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र- वरील कागदपत्रे नसतील तर ७२ तासांच्या आतील निगेटिव्ह रिपोर्ट

रुमाल, एकपदरी मास्क असेल तर दंडहा व्हायरस अधिक प्रभावी असल्याने प्रत्येकाकडे एन ९५ मास्क, तीनपदरी मास्क किंवा सर्जिकल तीनपदरी मास्क असेल तरच मास्क घातला असे समजले जाईल. रुमाल किंवा एकपदरी मास्क असेल तर मास्क घातलेला नाही असे समजून ५०० रुपयांचा दंड केला जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन