शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. अभिनव देशमुख म्हणाले -आपली कोणतीही माहिती लपवू नये, प्रशासनाला सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:33 IST

डॉ. देशमुख म्हणाले, संबंधित व्यक्ती रुग्णालयात तपासणीसाठी गेला का याबाबत क्रॉस चेकिंग केले जाते. त्याचबरोबर संबंधिताला फोनवरुनही नियंत्रण कक्षामधून विचारणा करण्यात येते.

ठळक मुद्देएका दिवसात 2 हजार वाहनांचा प्रवेश --पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख

कोल्हापूर: माल वाहतूक वाहनामधून प्रवासी वाहतूक होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता पोलीसांकडून घेण्यात येत आहे. जयसिंगपूर जवळील अंकली-उदगाव तपासणी नाक्यामधून काल एका दिवसात दोन हजार वाहनांचा प्रवेश झाला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज अंकली-उदगाव तपासणी नाक्याला भेट देवून पाहणी केली. याठिकाणी अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उप अधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून काटेकोरपणे तपासणी सुरु होती.

अपर पोलीस अधीक्षक श्री. घाडगे यांनी यावेळी माहिती दिली. दुचाकी वाहनांसाठीस्वतंत्र मार्ग ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर चारचाकी आणि मालवाहतूक वाहनांसाठीहीस्वतंत्र मार्ग ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहन धारकाचीवैद्यकीय तसेच प्रवेश पत्राची तपासणी करण्यात येत आहे. मालवाहतूक वाहनांवर स्टिकरचिकटवण्यात येत आहे. थर्मल स्कॅनरद्वारेही तपासणी होत आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या 61रस्त्यांपैकी 19 मार्गावर तपासणी नाके ठेवण्यात आले आहेत. याच ठिकाणी वैद्यकीय पथकेहीठेवण्यात आली आहेत. दररोज पोलीस आणि वैद्यकीय पथक यांच्याकडून जिल्ह्यामध्ये प्रवेशकरणाऱ्या वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी करण्यात येते. विशेषत: मालवाहतूक वाहनातूनप्रवसी वाहतूक होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेतली जाते.

काल एका दिवसात या नाक्यामधून सुमारे दोन वाहनांचा प्रवेश झाला आहे. जिल्ह्यातील एकूण 19 तपासणी नाक्यांमधून सुमारे 8 हजार वाहने दररोज येत आहेत. यासर्वांची नोंद ठेवण्यात येत आहे. परवाना घेवून येणाऱ्या व्यक्तींसाठी तीन प्रतीत स्टिकर बनविण्यात आले आहे. एक प्रत तपासणी पथकाकडे दुसरी प्रत संबंधिताकडे तर तिसरी प्रत रुग्णालयातील पोलीस अधिकाऱ्याकडे दिली जाते, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, संबंधित व्यक्ती रुग्णालयात तपासणीसाठी गेला का याबाबत क्रॉस चेकिंग केले जाते. त्याचबरोबर संबंधिताला फोनवरुनही नियंत्रण कक्षामधून विचारणा करण्यात येते. प्रवाशांनीही अत्यावश्यक कामासाठी परवाना घेवूनच प्रवास करावा. आपली कोणतीही माहिती लपवू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस