शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

‘सीबीएस’वर हातगाड्या हटविताना तणाव, जोरदार खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 17:55 IST

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथील इन आणि आउटच्या प्रवेशद्वारांलागतच हातगाड्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील हातगाड्या हटविण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आले. यावेळी फेरीवाले आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. सुमारे तीन तास येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी ३३ हातगाड्या हटविण्यात आल्या. पुनर्वसनासंदर्भात चार दिवसांत बैठक घेतली नाही तर पुन्हा याच ठिकाणी हातगाड्या लावण्यात येतील, असा इशारा फेरीवाल्यांनी दिल्या.

ठळक मुद्दे‘सीबीएस’वर हातगाड्या हटविताना तणाव फेरीवाले, महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) येथील इन आणि आउटच्या प्रवेशद्वारांलागतच हातगाड्या लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील हातगाड्या हटविण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक आले. यावेळी फेरीवाले आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. सुमारे तीन तास येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. यावेळी ३३ हातगाड्या हटविण्यात आल्या. पुनर्वसनासंदर्भात चार दिवसांत बैठक घेतली नाही तर पुन्हा याच ठिकाणी हातगाड्या लावण्यात येतील, असा इशारा फेरीवाल्यांनी दिल्या.शहर वाहतूक शाखा आणि महापालिका प्रशासन यांच्यामध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या बैठकीत मध्यवर्ती बसस्थानक येथील इन आणि आउटच्या प्रवेशद्वारालगत असणाऱ्या हातगाड्या हटविण्याचा निर्णय झाला होता. यानुसार महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आले. यावेळी कारवाई करताना फेरीवाल्यांनी जोरदार विरोध केला. महापालिकेचे उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख पंडित पवार आणि फेरीवाले संघटनेचे दिलीप पवार, रघू कांबळे यांच्यात वादावादी झाली.घाटगे म्हणाले, मध्यवर्ती बसस्थानकाच्या सुरक्षा भिंतीलगतच्या सर्व फेरीवाल्यांचे तात्पुरते जेम्स स्टोन येथील गल्लीमध्ये पुनर्वसन करण्यात येईल. दरम्यान, महापालिकेमध्ये फेरीवाले, प्रशासन यांची चार दिवसांत बैठक घेऊन कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला जाईल. याला काही फेरीवाल्यांना विरोध केला. यावर घाटगे यांनी जेम्स स्टोन येथील बंद असणाऱ्या गाड्या जप्त करण्याची भूमिका घेतली.

दरम्यान, वटेश्वर मंदिर येथील हातगाड्या हटविल्यामुळे पुन्हा फेरीवाले आक्रमक झाले. याच ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यानंतर एका फळविके्रत्याची हातगाडी जप्त करताना जोरदार खडाजंगी झाली. अखेर २४ किंवा २७ डिसेंबर रोजी फेरीवाल्यांची बैठक घेऊन पर्यायी जागेवर निर्णय घेतला जाईल, अशी प्रशासनाने ग्वाही दिली. बैठक घेतली नाही तर पुन्हा याच ठिकाणी गाड्या लावू, असा इशारा फेरीवाल्यांनी दिला. यानंतर परिसरातील ३३ हातगाड्या हटविण्यात आल्या.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर