शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, मेहुण्याचा अडकित्याने खून, राशिवडे येथील घटना, ‘सीपीआर’मध्ये तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 18:16 IST

कौटुंबिक वादातून राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे पतीने सुपारी कातरणाऱ्या अडकित्याने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंजाबाई कावणेकर (वय ४५), तिचा भाऊ केरबा हिवराप्पा येडके (४०, कोथळी, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. मंजाबाईचा पती सदाशिव खानू कावणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देपत्नी, मेहुण्याचा अडकित्याने खूनराशिवडे येथील घटना, ‘सीपीआर’मध्ये तणाव

राशिवडे/कोल्हापूर : कौटुंबिक वादातून राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे पतीने सुपारी कातरणाऱ्या अडकित्याने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंजाबाई कावणेकर (वय ४५), तिचा भाऊ केरबा हिवराप्पा येडके (४०, कोथळी, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. मंजाबाईचा पती सदाशिव खानू कावणेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मंजाबाई राशिवडे गावच्या माजी ग्रामपंचायत सदस्या आहेत. आज, मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ही घटना घडली. राशिवडे पोलिसांनी याप्रकरणी सदाशिव खानु कावणेकर (वय ५२) याला ताब्यात घेतले आहे.हल्लेखोर सदाशिव यांने सुपारी कातरणाºया अडकित्याने हा हल्ला केला. जखमीना नातेवाईकांनी उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात आणले. मात्र उपचारादरम्यान दोघाचा मृत्यु झाला. या घटनेने राशिवडे गावावर शोककळा निर्माण झाली आहे.‘सीपीआर’मध्ये तणावराशिवडे येथील दुहेरी खून प्रकरणातील मंजाबाई कावणेकर व केरबा येडके या बहीण-भावांचे मृतदेह ‘सीपीआर’मध्ये आणले. यावेळी नातेवाइकांनी अपघात विभागासमोर मोठी गर्दी केली. त्यापाठोपाठ भुयेवाडी, आजरा येथील सर्पदंश झालेले आणि विषप्राशन केलेले रुग्णही दाखल झाले. काही वेळाने उपचार सुरू असताना त्यांतील दोन रुग्ण दगावल्याने त्यांच्याही नातेवाइकांनी गर्दी केल्याने गोंधळ उडाला. नातेवाइकांचा आक्रोश पाहून बघ्यांची गर्दी झाली. कोण कोणासाठी आला आहे, हे काहीच समजत नव्हते.खून प्रकरणामुळे अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, करवीरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक अनिल गुजर सीपीआर रुग्णालयामध्ये आले. बघ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी बंदोबस्ताला असलेले पोलीस व सीपीआरच्या सुरक्षारक्षकांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर परिसर मोकळा झाला. या घटनांमुळे सीपीआर परिसरात तणाव पसरला होता.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर