शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

प्रत्येक विद्यार्थ्यांत वैज्ञानिक होण्याची ताकद

By admin | Updated: November 30, 2015 01:11 IST

शरद काळे : नेसरीत बालवैज्ञानिक संमेलन उत्साहात, विज्ञान प्रभातफेरी

नेसरी : मुलांनो खेड्यात जन्माला आलो हा न्यूनगंड बाळगू नका, मराठी माध्यमातून शिक्षण घेत असल्याची लाजही वाटण्याची आवश्यकता नाही. शिवाय केमस्ट्री, फिजिक्स व बायॉलॉजी म्हणजे विज्ञान नव्हे, तर प्रत्येक गोष्टीत विज्ञान भरलेले आहे. त्याचा शोध घेणे जरुरीचे असून प्रत्येक विद्यार्थ्यात वैज्ञानिक होण्याची ताकद आहे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा, असे प्रतिपादन भाभा अणुशक्ती केंद्राचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी केले.ते मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज उपविभाग नेसरीद्वारा आयोजित बालवैज्ञानिक संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नेसरी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष व पंचायत समिती अ‍ॅड. हेमंत कोलेकर होते. यावेळी प्रकल्प संयोजक (मुंबई) अभय यावलकर, डॉ. नूतन खलप यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. शरद काळे व मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक व स्वागत कार्यवाह एस. एस. मटकर यांनी केले.डॉ. काळे म्हणाले, आमची पिढी चुकली, पण येणाऱ्या पिढ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी प्रयत्न आहे. या भागात प्रचंड जैवविविधता आहे. इथल्या जैवविविधता गोळा करा. त्याचा अभ्यास करून आमच्याकडे काय आहे हे जगाला दाखवा. पृथ्वी हे आम्हाला मिळालेले डिपॉझिट आहे. त्याच व्याज हे सर्वांनी फेडणे गरजेचे आहे. निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने किमान ३ झाडे लावावीत.डॉ. काळे यांनी आपल्या दीड तासांच्या मार्गदर्शनात भारतातील अंधश्रद्धा व संस्कृतीबद्दल माहिती स्पष्ट करत निसर्गाला आम्ही विसरत चाललो आहोत, अशी खंत व्यक्त केली. यावेळी अभय यावलकर, डॉ. नूतन खलप यांनी मनोगते व्यक्त केले. अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.विज्ञान प्रभातफेरीचा हिरवा झेंडा दाखवून सरपंच वैशाली पाटील यांच्याहस्ते प्रारंभ झाला. विज्ञानवादी घोषणा देत गावातील प्रमुख मार्गावरून ही फेरी तुकाराम कृष्णाजी कोलेकर महाविद्यालयात दाखल झाली. दुपारी लहान गट व मोठा गटातील बालवैज्ञानिकांनी आपले प्रकल्प सादर केले.याप्रसंगी उपसरपंच दयानंद नाईक, अंजना साखरे, अर्चना कोलेकर, अनिता मटकर, अशोक पांडव आदी उपस्थित होते, तर समारंभ कार्यक्रमास प्रा. डॉ. एस. डी. पाटील, विनोद नाईकवाडे, निसर्गमित्र अनिल चौगुले, प्रा. कल्याणराव पुजारी, प्रा. अनिल मगर, बी. जी. काटे, रामचंद्र सुतार, अर्चना कोलेकर, कृष्णराव रेगडे, आर. बी. पाटील, प्रा. एस. एल. पाटील बी. बी. कांबळे, आय. टी. नाईक, डॉ. घेवडे, वाय. एस. नाईक, विजय नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)