शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

शिवाजी मार्केटमधील दुकानास आग  : नऊ  लाखांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 18:48 IST

  कोल्हापूर : येथील शिवाजी चौकातील शिवाजी मार्केटच्या तळमजल्यात असणाऱ्या श्रीकृष्ण किराणा स्टोअर्स या दुकानाला बुधवारी पहाटे आग लागून ...

ठळक मुद्देआग शॉर्ट सर्किटने लागली असण्याची शक्यता किराणा साहित्य जळून खाक    

 कोल्हापूर : येथील शिवाजी चौकातील शिवाजी मार्केटच्या तळमजल्यात असणाऱ्या श्रीकृष्ण किराणा स्टोअर्स या दुकानाला बुधवारी पहाटे आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. दुकानातील धान्यासह संपूर्ण किराणा माल आगीच्या भक्षस्थानी पडला. आगीत सुमारे आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली आहे.  

महापालिकेच्या शिवाजी मार्केटच्या तळमजल्यातील दोन दुकानगाळ्यात राजेश व गणेश भरतू बुड्डे (रा. बाजार गेट, महानगरपालिकेनजीक) या बंधूंचे श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स हे किराणा मालाचे दुकान आहे. बुधवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण जनरल स्टोअर्सच्या दुकानातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यावेळी काहींनी तातडीने अग्निशमन दलास फोन करून कळविले. तातडीने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दुकानातून धुराचे लोट बाहेर येत होते. त्यांनी तातडीने दुकानाचे शटर कटरने कापून दुकान उघडले; पण दुकानात दारातच विविध धान्यांनी भरलेली पोती तसेच कौंटरचा अडथळा असल्याने जवानांना आत जाण्याची संधीच नव्हती. त्यात धुरामुळे दुकानातील काहीच दिसत नव्हते.

त्यावरच पाण्याचा मारा करत सुमारे दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. त्यावेळी दुकानमालक बुड्डे बंधू तसेच त्यांचे मित्र तातडीने घटनास्थळी आले. त्यावेळी आगीत संपूर्ण दुकानातील किराणा साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत दुकानातील विविध धान्यांची पोती, मसाल्याचे पदार्थ, किराणा मालाचे साहित्य जळून खाक झाले. आग विझल्यानंतर सायंकाळपर्यंत दुकानातील जळलेले साहित्य काढण्याचे काम सुरू होते. प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये असणाºया तेलामुळे ही आग पसरली होती. आगीत जळल्याने आणि पाण्याचा मारा झाल्याने दुकानातील ९० टक्के साहित्याचे नुकसान झाले.वृत्तपत्र विक्रेत्याच्या दक्षतेमुळे पुढील अनर्थ टळलापहाटेच्या सुमारास या शिवाजी मार्केटमधील अनेक दुकानांत कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते हे वृत्तपत्र टाकतात. बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता व्हनगुत्ते हे मार्केटच्या इमारतीत वृत्तपत्र टाकण्यासाठी गेले असता त्यांना संपूर्ण मार्केटच्या आतील बाजूस धुराचे लोट दिसले, तर अंधारातच श्रीकृष्ण जनरल स्टोअर्स दुकानात शटरच्या खालून आग बाहेर येताना दिसली. त्या धुराच्या लोटामध्ये व्हनगुत्ते गुदमरले होते. त्यांनी त्यावेळी तातडीने मार्केटबाहेर येऊन अग्निशामक दलास फोन करून कल्पना दिली, .त्यामुळे अग्निशमन दलाचे बंब  तातडीने घटनास्थळी येऊन आग अटोक्यात आली. अन्यथा या दुकानाच्या परिसरात अनेक दुकाने आहेत. किरण व्हनगुते यांनी वेळीच दक्षता घेऊन अग्निशमन दलास कळविल्याने पुढील अनर्थ टळला.आयुक्त व लोकप्रतिनिधींकडून पाहणी घटना घडल्यानंतर तातडीनेआयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेविका उमा बनसोडे, माजी नगरसेवक श्रीकांत बनसोडे तसेच महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.-------------फोटो देतो.. तानाजी

टॅग्स :kolhapurकोल्हापूर