शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी शनिवारी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:17 IST

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाई, चालढकल कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. या ...

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाई, चालढकल कारभारामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप महाराष्ट्र ओबीसी मोर्चातर्फे शनिवारी (२६ जून) शहर आणि जिल्ह्यात महसूल मंडलनिहाय रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केली. या आंदोलनात सर्व पक्षातील ओबीसी नेते, कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेस भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने वारंवार सांगूनही राज्य सरकारने ओबीसी समाजाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला नाही. सरकारच्या अशा निष्काळजीपणामुळे ३४६ उपजाती असलेल्या ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द झाले. मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यासही त्यांनी जाणीवपूर्वक विलंब लावला. अशाप्रकारे सरकारची भूमिका राहिली तर ओबीसींचे नोकरी आणि शिक्षणातीलही आरक्षण संपू शकते.

ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनमानीपणे ७ मे २०२१ रोजी पदोन्नतीमधील ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याचा आदेश काढला. या आदेशाला सरकारमधील काँग्रेसचे नेते विरोध करू शकले नाहीत. गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार भाजप सरकारने मराठा समाजास आरक्षण दिले होते. महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात तेही टिकवता आले नाही. सरकार जातीजातींमध्ये भांडणे लावत आहे. प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलून जबाबदारी झटकत आपला बचाव करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यातही सरकारला यश आलेले नाही. परिणामी अनेकांचा मृत्यू झाला. यामुळे भाजपतर्फे सरकारच्या चुकीच्या कामकाजा विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.

पवार यांच्या राजकारणाचा अस्त जवळ..

सरकारमध्ये काका, पुतण्याचाच कारभार सुरू आहे. ते जातीयवादी, भ्रष्ट कामकाज करीत आहेत. स्वत:च्या कुटुंबांतील सदस्यांच्या प्रगतीसाठीच ते प्रयत्नशील आहेत. शरद पवार स्वत: राजकीय चाणक्य समजत असताना ते भाडोत्री राजकीय चाणक्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जात आहेत, यावरून त्यांच्या राजकारणाचा अस्त जवळ आला आहे, असे जाणवत आहे.