शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

पिंपळगावात शिवसेनेचा रास्ता रोको

By admin | Updated: July 19, 2016 23:48 IST

पठारावरील बांध फोडल्याचे प्रकरण : बांध पूर्ववत बांधावा, दोषींवर कारवाई करा : देवणे

उत्तूर : भुदरगड तालुक्यातील मेघोलीच्या पठारावरील म्हातारीच्या पठारावर घालण्यात आलेला बांध अज्ञातांनी सोमवारी फोडला. तो बांध वनविभागाने पूर्ववत बांधावा व दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी पिंपळगाव (ता. भुदरगड) येथे शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या रास्ता रोकोप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.गारगोटी-उत्तूर मार्गावर पिंपळगाव येथे शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. यावेळी दोन्ही बाजंूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. देवणे म्हणाले, म्हातारीच्या ओढ्यावरील पाणी वळल्यामुळे चिकोत्रा धरण भरेल, अशी आशा निर्माण झाली होती; पण बांध फोडून समाजकंटकांनी शेतकऱ्यांच्या ताटात विष ओतण्याचे काम केले आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून ही योजना राबविली. नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करावी. त्यांच्या पाठीशी कोणीही राहू नये.पठारावर पाण्याचे नियोजन करताना जिल्हाधिकारी व वनसंरक्षक यांच्यात झालेल्या बैठकीवेळी पठारावरील पाणी गरजेनुसार मेघोली प्रकल्पाकडे वळविण्यासंदर्भात विचार विनियम झाला होता. अजून पावसाळा सुरू आहे. चिकोत्रा प्रकल्पात थोडा पाणीसाठा झाल्यानंतर उर्वरित पाणी मेघोली प्रकल्पाकडे वळविण्याचे नियोजन होते. मात्र, समाजकंटकांनी आततायीपणा केला. अशा घटना घडू नयेत यासाठी वन खाते, पोलिस खाते व पाटबंधारे विभाग यांनी योग्य भूमिका घ्यावी; अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल. उपजिल्हाप्रमुख प्रवीणसिंह सावंत, आदींची भाषणे झाली. यावेळी उपतालुकाप्रमुख अशोक पाटील, अविनाश शिंदे, विक्रम पाटील, तानाजी देसाई, सुरेश पाटील, वनक्षेत्रपाल अशोक पाटील, वनपाल शीतल पाटील, वनसंरक्षक अमोल चव्हाण, पाटबंधारे शाखा अभियंता यू. एम. कापसे, मंडल अधिकारी ए. आर. कोळी, आदी उपस्थित होते.पंधराजणांवर वन विभागाकडून गुन्हा दाखलगारगोटी : म्हातारीच्या पठारावर वन विभागाने वन्य जिवांसाठी बांधलेल्या बंधाऱ्याची भिंत सोमवारी संध्याकाळी अज्ञात दहा ते पंधराजणांनी फोडल्याप्रकरणी भुदरगड वन विभागाचे वनक्षेत्रपाल ए. एस. पाटील यांनी भुदरगड पोलिसांत तक्रार दिली आहे.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, पिंपळगाव खोऱ्यातील बेडीव धनगरवाड्याच्या म्हातारीच्या पठारावर वन विभागाने बंधारा घालून पाणी अडविले. हे पाणी चिकोत्रा प्रकल्पात सोडण्यात येणार असल्याने अज्ञातांनी बंधाऱ्याचा बांध सोमवारी संध्याकाळी फोडला. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले आहे. मेघोलीच्या काही समाजकंटकांनी हा बांध फोडल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य विश्वनाथ कुंभार यांनी केला. सोमवारी संध्याकाळी घटनास्थळी विश्वनाथ कुंभार यांनी नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे, मंडल अधिकारी कोळी, वनक्षेत्रपाल ए. एस. पाटील, वनपाल शीतल पाटील, दीपक पाटील, आदींसमवेत प्रत्यक्ष भेट देऊन बंधाऱ्याची पाहणी केली. दरम्यान, या कामास मेघोली परिसरातील लोकांनी पहिल्यापासून विरोध दर्शविला. कारण हे पाणी मेघोली प्रकल्पाऐवजी चिकोत्रा प्रकल्पात सोडण्यात येणार होते. या नव्या बंधाऱ्यात १०० एम. सी. एफ. टी. पाणी साठवण क्षमता आहे. हे पाणी मेघोलीला मिळावे, या हेतूने अज्ञातांनी बंधाऱ्याचा बांध फोडला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास सहायक फौजदार आर. जी. पाटील हे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. बांध फोडला;पण पाणी वाया!म्हातारीच्या पठारावरील बांध फोडण्यात यशस्वी झालेल्या समाजकंटकांनी बांध फोडला; पण पाणी मेघोलीच्या प्रकल्पाकडे न जाता ते दुसरीकडे गेले. त्यामुळे लाखो क्युसेस पाणी वाया गेल्याची चर्चा आंदोलनस्थळी होती.