शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

एचसीएल कंपनीचे बिल थांबवा

By admin | Updated: December 21, 2014 00:11 IST

महापालिका सभेत निर्णय : पैशाचा हिशेबच नाही; अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक

कोल्हापूर : शहरवासीयांना सर्व प्रकारचे दाखले संगणकावर देणारी एचसीएल कंपनी झालेल्या कराराप्रमाणे काम करीत नसल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. जोपर्यंत कंपनी सर्व यंत्रणा अपडेट करीत नाही तोपर्यंत या कंपनीचे बिल थांबविण्याचा निर्णय आज, शनिवारी महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. दरम्यान, लवकरच या कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही प्रभारी आयुक्त नितीन देसाई यांनी सभागृहाला दिली. एचसीएल कंपनी करारातील अटींप्रमाणे काम करीत नाही. सर्व यंत्रणा पाच वर्षांत अपडेट करायची होती; परंतु ती त्यांनी केलेली नाही. यंत्रणा अपडेट नसल्याचा फटका नागरिक आणि महापालिकेला बसत आहे. कंपनीला दिलेल्या २ कोटी ७५ लाखांच्या बिलावर सेंट्रल आॅडिट रिपोर्टमध्ये आक्षेप घेतले आहेत. कंपनीने ताळेबंद सादर केलेला नाही. तसेच कंपनीला किती पैसे दिले याचा हिशेब पालिकेकडे नाही. कंपनी आपले काम शंभर टक्के करीत नाही याकडे महेश कदम यांनी लक्ष वेधले. संबंधित विषयाला उत्तर द्यायला जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने प्रभारी आयुक्त देसाई यांनी पुढील सभेत याबाबत माहिती देतो, असे सांगितले; परंतु त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. निशिकांत मेथे, मुरलीधर जाधव यांनी या कंपनीला कोणी अधिकारी सामील आहेत का, अशी शंका उपस्थित केली. जर कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत नसेल तर त्यांचे बिल देण्याचे थांबवा, अशी मागणी संभाजी जाधव यांनी केली. त्यावेळी प्रभारी आयुक्त देसाई व उपायुक्त विजय खोराटे यांनी कंपनीची बिले थांबविण्याची ग्वाही सभागृहाला दिली. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीवर सभागृहात चर्चा झाली. प्रशासन जाणीवपूर्वक पदोन्नती डावलत आहे. यामागे कोणाचा अहंकार नडला आहे का, अशी विचारणा राजू लाटकर यांनी केली. २६ वर्षे पदोन्नतीपासून कर्मचारी वंचित राहत असतील तर ती प्रशासनाची चूक असल्याचे लाटकर म्हणाले. पदोन्नतीच्या मुद्द्यावर प्रशासनातील एक टोळके विद्वत्ता असलेल्यांना पुढे जाऊ देत नाही, असा टोला भूपाल शेटे यांनी हाणला. (प्रतिनिधी)