शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

महापौर माळवींच्या घरावर दगडफेक

By admin | Updated: March 6, 2015 01:19 IST

खिडक्यांच्या काचा फोडल्या : मध्यरात्रीनंतर अज्ञात व्यक्तींकडून कृत्य; पोलिसांत गुन्हा

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी बुधवारी मध्यरात्री दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या खिडक्यांची काचेची तावदाने फुटली आहेत. राजारामपुरी पाचव्या गल्लीत हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महापौर माळवी यांनी राजीनामा देण्यावरून शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी माळवी यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी (दि. ३) महानगरपालिकेतून घरी जात असताना महापौर माळवी यांची गाडी अडवून नगरसेवकांनी हल्ला केला होता. याप्रकरणी ३६ नगरसेवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री अचानक काही अज्ञात व्यक्तींनी माळवी यांच्या घरावर दगडफेक केली. महापौरांच्या राजीनामा नाट्याला हिंसक वळण लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौर माळवी यांचा राजारामपुरी पाचव्या गल्लीत आनंदी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये त्या दोन मुले व सासू शकुंतला माळवी यांच्यासोबत राहतात. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्या आई पद्मा अथणे याही माळवी यांच्या घरी राहायला आल्या आहेत. बुधवारी रात्री या तिघी व दोन मुले झोपी गेली. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अचानक घरावर दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. अज्ञातांनी मागील बाजूस असलेल्या स्वयंपाकघराच्या दिशेनेही दगडफेक केली. दगडफेकीमुळे पहिल्या खोलीत झोपलेल्या शकुंतला, पद्मा व आतील खोलीत असलेल्या महापौर माळवी घाबरल्या. त्यांनी दरवाजे उघडले नाहीत. त्यांनी तत्काळ राजारामपुरी पोलीस ठाण्याला फोन केला व घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलीस पाच-सहा मिनिटांतच पोहोचले. त्यानंतरच दरवाजा उघडला. पोलीस येण्यापूर्वीच हल्लेखोरांनी पलायन केले. गस्तीच्या पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला; पण ते सापडले नाहीत. पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली. पहाटे तीन वाजता महापौर माळवी या राजारामपुरी पोलीस ठाण्यात गेल्या; पण आपण घाबरलेल्या अवस्थेत असल्याने सकाळी येऊन फिर्याद देते, असे सांगून त्या निघून गेल्या. गुरुवारी सकाळी त्या अकरा वाजता पोलीस ठाण्यात गेल्या. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याशी चर्चा करून त्यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पोलिसांत अज्ञातांविरुद्ध भा. दं. वि. स. कलम ३३६ व ४२५ नुसार गुन्हा नोंद केला आहे.