शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खामकरवाडी तलावात दगडांचे ढिगारे

By admin | Updated: June 13, 2016 00:13 IST

पाणीसाठ्यास मर्यादा : बारा वर्षांत पहिल्यांदाच गाठला तळ; शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

श्रीकांत ऱ्हायकर -- धामोड --खामकरवाडी लघुपाटबंधारे तलावामध्ये पाणीसाठा करावयास सुरुवात केल्यापासून तब्बल बारा वर्षांनंतर प्रथमच तलावाने तळ गाठला आहे. सध्या या तलावातील उर्वरित पाणीसाठ्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लवकर भरणारा व लवकर कोरडा पडणारा, अशी ख्याती मिळविलेल्या या तलावाचे खरे स्वरूप आता लक्षात आले असून, या तलावाच्या बुडीत पाणीसाठ्यातच खुदाई केलेल्या दगडांच्या प्रचंड मोठ्या खाणी दिसत असून, हा दगड बाहेर न टाकल्यानेच याचा परिणाम पाणीसाठ्यावर होत आहे. त्यामुळे अवचितवाडी व खामकरवाडी येथील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.२००१-२००२ रोजी खामकरवाडी-अवचितवाडी दरम्यान खडकीच्या ओढ्यावर ११६२.७८ सहस्र घनमीटर इतकी पाणी साठवण करणाऱ्या तलावाची बांधणी करण्यात आली. मात्र, या तलावाची बांधणी करताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष व ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सुरुवातीपासूनच हा तलाव अडथळ््यांची शर्यत पार करीत आला. चालू वर्षी उन्हाळ््याची तीव्रता प्रचंड वाढल्याने तलावातील पाणी पातळी पूर्णत: कमी झाली. आता हा तलाव पूर्णत: कोरडा पडला असून, या तलावातील शिल्लक पाणीसाठ्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या तलावाच्या खुदाईवेळी व अस्तरीकरणासाठी बुडीत पाणीसाठ्यात खणी मारून उकरलेला दगड तलावाच्या मृत पाणीसाठ्यातच प्रचंड मोठ्या प्रमाणात साठवल्याने व काम पूर्णत्वास आल्यानंतरही तो बाहेर न काढल्याने पाणीसाठ्यावर याचा गंभीर परिणाम होत असून, ११६२.७८ सहस्र घनमीटर इतक्या पाणी साठवण क्षमतेच्या तलावात प्रत्यक्षात कमीच पाणी साठत आहे. बहुतांश दगडांच्या मोठमोठ्या खणी व त्यातील दगड हा मुख्य दरवाजाच्या जवळच धरणातच बुडीत क्षेत्रातच टाकला गेल्याने याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. प्रत्यक्षात ११६२.७८ सहस्र घनमीटर क्षमतेच्या पाणीसाठ्याच्या तलावात सध्या १००० सहस्र घनमीटरचे पाणी साठत असल्याचे निदर्शनास येत आहे.