शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ढवळून काढणारा प्रचारच नाही सीमाभागातील वातावरण : मोजक्या कार्यकर्त्यांसह पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:31 IST

बेळगाव : हलगी, घुमक्याचा आवाज नाही, उमेदवार गल्लीत आले की फटाक्यांची माळ नाही, शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था बरोबर नाही, अशा वातावरणात महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील सीमाभागात

समीर देशपांडे ।बेळगाव : हलगी, घुमक्याचा आवाज नाही, उमेदवार गल्लीत आले की फटाक्यांची माळ नाही, शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था बरोबर नाही, अशा वातावरणात महाराष्ट्राला लागून असलेल्या कर्नाटकातील सीमाभागात विधानसभा निवडणुकीचे वातावरण दिसून येत आहे. कोल्हापूर आणि परिसरातील निवडणुकीच्या वातावरणापेक्षा तर हे वातावरण शांतच वाटते.बेळगावपासून जवळच असलेल्या खानापुरात आम्ही गेलो तर बाजारात नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. अरविंद पाटील आणि विलास बेळगावकर या उमेदवारांच्या कार्यालयात निवडक कार्यकर्ते बसून होते. उमेदवार ग्रामीण भागात प्रचाराला गेले होते. मधूनच दोन चार पक्षाचे झेंडे लावलेल्या गाड्या ये-जा करत होत्या. बेळगावमध्येही कुठेही फार मोठ्या पदयात्रा दिसून आल्या नाहीत. दिवसभर ऊन म्हणून संध्याकाळी वातावरण तापेल म्हटले तरी अगदी मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन उमेदवार भेटी देत असल्याचे दिसून आले. कुठेही जंगी पदयात्रा काढण्यात आल्याचे चित्र दिसत नव्हते. हुक्केरीमध्ये मात्र रिक्षा आणि जीपमधून गाण्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू होता.गाड्यांना झेंडे लावले होते आणि रेकॉर्ड केलेली आवाहनाची कन्नड गाणी येथे ऐकायला मिळाली. चिकोडीमध्येही यापेक्षा वेगळे वातावरण नव्हते. मात्र निपाणीत आल्यानंतर वातावरणात फरक पडला. या ठिकाणी काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दुसरीकडे आमदार शशिकला जोल्ले यांनी चारचाकी गाडीला रथासारखा आकार दिला होता, ती गाडी दिसत होती. काका पाटील यांच्या प्रचारासाठी एक मराठी शाहीर पथकच कार्यरत असल्याचे येथे दिसून आले. सुशीलकुमार शिंदेंच्या प्रचारसभेसाठी आवाहन केले जात होते. निपाणीत आल्यानंतर निवडणुकीचा माहोल वाटत होता. शेवटच्या टप्प्यात वातावरणनिर्मिती आता शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचाराची आखणी उमेदवारांनी केल्याचे दिसून आले. आतापर्यंत छोटी छोटी गावे संपवून शेवटच्या टप्प्यात मोठ्या मोठ्या गावांमध्ये प्रचाराचा धुरळा उडेल, असे चित्र आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८