शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

सेंट्रिंग कामगाराचा भोसकून खून

By admin | Updated: June 10, 2014 02:16 IST

मुख्य संशयितास अटक : तिघे फरार; पूर्ववैमनस्यातून सुधाकर जोशीनगरात घटना

कोल्हापूर : भावाला मारहाण केल्याचा जाब विचारण्यास गेलेल्या सेंट्रिंग कामगारास आज, सोमवारी रात्री नऊच्या सुमारास चौघा तरुणांनी सत्तूरने भोसकले. गंभीर जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. नीलेश दशरथ कांबळे (वय २६, रा. सुधाकर जोशीनगर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ दीपक याने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, जुना राजवाडा पोलिसांनी रात्री उशिरा मुख्य संशयित आरोपी सचिन बबरू गायकवाड (२९, रा. कळंबा, ता. करवीर) याला अटक केली, तर त्याचे साथीदार संशयित प्रभू गायकवाड, अर्जुन दबडे, सहदेव कांबळे हे तिघे पसार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले, नीलेश कांबळे हा सेंट्रिंगचा व्यवसाय करीत होता. तो खडी-वाळू मिक्स करणारे मिक्सर मशीन भाड्याने देत असे. त्याच्या स्वत:च्या घराचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्यासाठी त्याने खडी-वाळू आणून ती रस्त्याच्या कडेला ओतली होती. आज रात्री नऊच्या सुमारास त्याचा लहान भाऊ दीपक हा आपल्या घरी खडी भरून नेत होता. यावेळी या ठिकाणी संशयित आरोपी सचिन गायकवाड, प्रभू गायकवाड, अर्जुन दबडे, सहदेव कांबळे हे चौघेजण आले. यावेळी त्यांनी दीपकला मारहाण करीत मी जोपर्यंत या ठिकाणी आहे, तोपर्यंत खडी न्यायची नाही, अशी दमदाटी केली. त्यानंतर दीपकने घरी जाऊन हा प्रकार भाऊ नीलेश याला सांगितला. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी तो बाहेर गल्लीत उभ्या असलेल्या चौघांसमोर आला. तू माझ्या भावाला का मारलास, अशी त्याने विचारणा करताच सचिन गायकवाड याने जवळ असलेल्या सत्तूरने त्याच्या पोटात सपासप वार केले. यावेळी वार चुकविताना त्याच्या उजव्या हातावरही वार लागला. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. त्यानंतर सर्वजण पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या नीलेशला दीपकने रिक्षातून सीपीआरमध्ये आणले. याठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती सुधाकर जोशीनगरमध्ये समजताच त्याच्या नातेवाईक व मित्र परिवाराने सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, उपनिरीक्षक इंद्रजित सोनकांबळे सहकार्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नीलेशचा भाऊ दीपक याच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर आरोपींच्या शोधासाठी पथके तत्काळ रवाना केली. दीड वर्षापूर्वीही हल्ला संशयित आरोपी सचिन गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. तो सुधाकर जोशीनगरात यापूर्वी राहण्यास होता. सध्या तो कळंबा येथे राहण्यास आहे. परंतु त्याची ऊठबस सुधाकरनगरमध्ये नेहमी असते. कामधंदा न करता परिसरात दहशत माजवित वर्चस्व निर्माण करण्याचा तो नेहमी प्रयत्न करीत असे. दीड वर्षापूर्वी त्याने व त्याच्या भावांनी दीपक कांबळे याच्यावर तलवार हल्ला केला होता. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी त्याची व नीलेशची वादावादी झाली होती. हा वाद दोन-तीन वेळा मिटविण्यात आला होता. नीलेशही बिल्डर असल्याने त्याचेही भागात बऱ्यापैकी वर्चस्व होते, हे सचिनला खटकत होते. त्यातून आज खडी उचलण्याच्या वादाचे निमित्त करून नीलेशचा त्यांनी काटा काढल्याची चर्चा घटनास्थळी होती. नीलेश कांबळे हा मृत झाल्याने अपघात विभागातील आॅपरेशन थिएटरमध्ये स्ट्रेचरवर त्याचा मृतदेह पांढऱ्या कपड्यात झाकून ठेवला होता. बाहेर त्याचे नातेवाईक व मित्र परिवार मोठी गर्दी करून होते. त्यामुळे अपघात विभागाच्या दोन्ही बाजूची प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती. सीपीआरच्या पोलीस चौकीत भाऊ दीपक याची पोलीस फिर्याद घेत होते. भाऊ मृत झाल्याची माहिती त्याला सांगितली नव्हती. फिर्याद पूर्ण झाल्यानंतर तो बाहेर आला आणि त्याने हंबरडा फोडला. स्वप्न भंगले.. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या नीलेश व दीपक हे आई व लहान अपंग भावासह सुधाकर जोशीनगरमध्ये राहतात. रोजगार करून त्यांच्या आईने या तिघांना लहानाचे मोठे केले. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने सेंट्रिंगची कामे करून दोघा भावांनी खडी-वाळू मिक्स करण्याचे मिक्सर मशीन घेतले. हे मशीन ते भाड्याने देत असत. या व्यवसायामध्ये त्यांनी चांगला जम बसविला होता. नवे घर बांधण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याचा काही महिन्यापूर्वी मुहूर्तही त्यांनी केला, परंतु हे स्वप्न पूर्ण होण्याअगोदरच नीलेशचा खून झाला. (प्रतिनिधी)