शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बिलांसाठी ‘कुंभी-कासारी’वर ठिय्या

By admin | Updated: March 31, 2015 00:28 IST

कुंभी-कासारी बचाव मंचचे आंदोलन : लवकरच थकीत बिले अदा करणार : गोधडे

कोपार्डे : कुंभी-कासारी साखर कारखान्याने १५ मार्चअखेर गाळप झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत, यासाठी कुंभी-कासारी बचाव मंचने ठिय्या आंदोलन सुरू केले.दरम्यान, कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव गोधडे यांनी ३१ जानेवारीअखेरची ऊसबिले दिली आहेत. लवकरच फेब्रुवारी, मार्च महिन्यांची बिले देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आश्वासन नको, ऊसबिले द्या, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कुंभी-कासारी बचाव मंचचे प्रवर्तक बाजीराव खाडे यांनी दिल्यानंतर संचालक मंडळही हतबल झाले.सोमवारी दुपारी एक वाजता कुंभी-कासारी बचाव मंचच्यावतीने कुंभी-कासारी कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव गोधडे यांनी आंदोलकांना सामोरे जाताना साखर कारखान्यांसमोरील साखरेच्या दररोज गडगडणाऱ्या दरामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची माहिती दिली. मात्र, खाडे यांनी शासनाने ३६५ दिवसांच्या पीक कर्जाचा स्लॅब ठरवला आहे. जर वेळेत कर्ज परतावा केला नाही, तर १२ ते १४ टक्के व्याज द्यावे लागणार आहे. आम्ही तुमच्याकडे ऊस पाठविला आहे. शासन मदत करणार नाही हे ऐकायला आम्ही येथे आलेलो नाही, असे ठणकावले. २०१३/१४ मध्ये एफआरपीसाठी ‘कुंभी’ला मिळालेले २० कोटींमधील एक पै ही एफआरपी देण्यासाठी आपण वापरलेला नाही. तो पैसा कुठे गेला, असा प्रश्न केला. सहा लाखांवर गाळप झाले असून, केवळ तीन लाख टनांचे पैसे दिले, असे प्रशासन सांगत असले, तरी बँकेत चौकशी केल्यानंतर १५ ते ३१ जानेवारीचा भरणा झालेला नाही. जर कर्ज परतावा झाला नाही, तर खते मिळणार नाहीत. आमच्या आंदोलनाने आमदारांना विधानसभेत शासनाच्या विरोधात बोलायला बळ मिळेल. जोपर्यंत १५ मार्चपर्यंतची ऊसबिले जमा होणार नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन कायम राहणार, असे बाजीराव खाडे यांनी सांगितले. त्यामुळे संचालक मंडळ तेथून उठून गेले. (वार्ताहर) बचाव मंच कुठे ?केवळ निवडणुका आल्या की, विरोधकांना शेतकऱ्यांचे हित समजते. आधी ऊस पाठवा मग दराचे बोला. आपल्या कार्यकर्त्यांनी इतर कारखान्यांना ऊस पाठविला. त्यावेळी बचाव मंच कुठे गेला होता. येथे तरी त्यांना संपूर्ण एफआरपी मिळाली आहे का? आपण शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देत असून, पै-पै शेतकऱ्यांना अदा करणार असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.