कोल्हापूर : संघटित राहून कोल्हापूरचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करा. कोल्हापूरची गरज निर्माण करा. येथील उद्योग बाहेर जाऊ देऊ नका. पुढील दहा वर्षांत कोल्हापूरच्या उद्योग प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठामपणे कार्यरत राहा, असे आवाहन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या (सीआयआय) महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी बुधवारी येथे केले.
येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनने अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘औद्योगिक समस्या आणि उपाय’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. शिवाजी उद्यमनगरमधील उद्योगपती माधवराव बुधले सभागृहातील या चर्चासत्राच्या प्रारंभी मुतालिक यांचा असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्योजकांनी एकाच छताखाली संघटित राहून कार्यरत राहिल्यास प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल. पुढील दहा वर्षांत २५ हजार नवे लघुउद्योगांची निर्मिती, लघुउद्योग मध्यम आणि मध्यम उद्योग मोठ्या उद्योगात रूपांतरित करण्याचे कोल्हापूरने ठरवावे. त्यासाठी उद्योजकीय संघटना आणि शासनाने पाठबळ द्यावे, असे मुतालिक यांनी सांगितले. दिनेश बुधले, सोहन शिरगावकर, रवि डोली, प्रभाकर घाटगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुतालिक यांनी मार्गदर्शन केले. प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, श्रीकांत दुधाणे, रणजीत शाह, संजय अंगडी, नितीन वाडीकर, बाबासाहेब कोंडेकर, अतुल आरवाडे, अमर करांडे, अभिषेक सावेकर, सचिन शिरगावकर, पल्लवी कोरगावकर, शाम देशिंगकर, मोहन पंडितराव, प्रशांत मोरे उपस्थित होते. हर्षद दलाल यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रदीप व्हरांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
मुतालिक म्हणाले
१) कोल्हापूरचा ऐतिहासिक उद्योग वारसा वाढवा
२) किमान वेतनवाढ, कॉरिडॉरमधील सहभागासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी एक पॅटर्न ठरवून काम करूया
३) कोणत्याही शहर, महानगराच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्थानिकांची आहे. त्याचे उत्तम उदाहरण औरंगाबाद आहे.
४) विनाकारण पडून असणाऱ्या शासकीय मालमत्ता खासगी संस्थांना कराराने वापरण्यास देऊन त्यातून शासनाला उत्पन्न मिळविता येईल.
५) सीआयआयने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला सहा व्हेंटिलेटर्सची मदत केली.
फोटो (२५०८२०२१-कोल-सुधीर मुतालिक चर्चासत्र, ०१) : कोल्हापुरात बुधवारी इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे आयोजित चर्चासत्रात ‘सीआयआय’च्या महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी डावीकडून कमलाकांत कुलकर्णी, दिनेश बुधले, सचिन मेनन, हर्षद दलाल, प्रसन्न तेरदाळकर उपस्थित होते.
250821\25kol_5_25082021_5.jpg~250821\25kol_6_25082021_5.jpg
फोटो (२५०८२०२१-कोल-सुधीर मुतालिक चर्चासत्र, ०१) : कोल्हापुरात बुधवारी इंजिनिअरींग असोसिएशनतर्फे आयोजित चर्चासत्रात ‘सीआयआय’च्या महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी कमलाकांत कुलकर्णी, दिनेश बुधले, सचिन मेनन, हर्षद दलाल, प्रसन्न तेरदाळकर उपस्थित होते.~फोटो (२५०८२०२१-कोल-सुधीर मुतालिक चर्चासत्र, ०१) : कोल्हापुरात बुधवारी इंजिनिअरींग असोसिएशनतर्फे आयोजित चर्चासत्रात ‘सीआयआय’च्या महाराष्ट्र स्टेट कौन्सिलचे अध्यक्ष सुधीर मुतालिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेजारी कमलाकांत कुलकर्णी, दिनेश बुधले, सचिन मेनन, हर्षद दलाल, प्रसन्न तेरदाळकर उपस्थित होते.