शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला शिवसेनेने फासले काळे

By admin | Updated: May 11, 2017 17:50 IST

बेताल वक्तव्याचा निषेध; मिरजकर तिकटी येथे जोरदार घोषणाबाजी

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ११ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात गुरुवारी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शिवसेनेतर्फे काळे फासण्यात आले. मिरजकर तिकटी येथे शिवसैनिकांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.शिवसैनिकांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास निदर्शनाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी ‘तूर शेतकऱ्यांच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’, ‘ शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या दानवे यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळे फासले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, ‘जय जवान-जय किसान’ याचा प्रदेशाध्यक्ष दानवे यांना विसर पडला आहे. नाही, तर अन्नदात्या शेतकऱ्यांबाबत त्यांनी असे बेताल वक्तव्य केले नसते. त्यांचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे. या निदर्शनामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, दत्ताजी टिपुगडे, अनिल पाटील, दिलीप देसाई, अमोल पोवार, शशी बिडकर, शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, कमलताई पाटील, जयश्री खोत, दिपाली शिंदे, राजू सांगावकर, राजू यादव, संभाजी भोकरे, धनाजी यादव, शरद चौगुले, शरद वाकरेकर, अविनाश शिंदे, प्रकाश पाटील, आदी सहभागी झाले होते. दरम्यान, या निदर्शनावेळी पुतळ्याला काळे फसताना शिवसैनिक आणि पोलिसांत काहीशी झटापट झाली. दानवे यांचे पुतना मावशीचे प्रेमदानवे त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे शेतकऱ्यांबाबत असणारे त्यांंचे पुतना मावशीचे प्रेम दिसून येत आहे. त्यांच्या पक्षाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता येत नसेल, तर किमान शेतकऱ्यांच्या परिस्थितीची टर त्यांनी उडवू नये. त्यांनी असे बेताल वक्तव्य करुन शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्याचा शिवेसना जाहीरपणे निषेध करीत असल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सांगितले.