शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

‘सर्किट बेंच’ला मंजुरी दिल्यास शहांचा पुतळा

By admin | Updated: September 4, 2015 00:47 IST

माणिक मुळीक यांचे प्रतिपादन महापालिकेतर्फे चबुतरा आणि पुतळ्यास जागा उपलब्ध करून देऊ : महापौर

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कोल्हापूरच्या ‘सर्किट बेंच’च्या मागणीस येत्या दोन-तीन दिवसांत न्याय मिळणार असून, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापूरला बेंच मंजूर केल्यास त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून आम्ही त्यांचा पुतळा उभा करू, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष माणिक मुळीक यांनी केले. ते शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी ज्येष्ठ विधिज्ञांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे होत्या.मुळीक म्हणाले, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा हे मंगळवारी (दि. ८) निवृत्त होत आहेत. त्यांची गोवा येथे खंडपीठ कृती समितीने भेट घेतली. यावेळी शहा यांनी कोल्हापुरात संस्थानकाळात हायकोर्ट होते, याचे पुरावे सादर करा. मी त्यातील सत्यता पडताळून तत्काळ याबाबत सकारात्मक निर्णय घेतो. माझ्या या निर्णयाचा लाभ कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील पक्षकारांना सोयीचा ठरणारा असेल तर लवकरच याबाबत ठोस निर्णय घेऊ, असा शब्द दिला आहे. त्यामुळे लवकरच कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांची ही मागणी पूर्ण होणार आहे. मागणी पूर्ण होताच कोल्हापुरात आम्ही त्यांचा पुतळा उभा करू. कारण ज्यांनी-ज्यांनी कोल्हापूरसाठी मोठे काम केले, त्या व्यक्तींचे पुतळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभे केले आहेत. त्याचप्रमाणे न्यायमूर्ती शहा यांचाही पुतळा उभा करून आम्ही कृतज्ञता व्यक्त करू. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर वैशाली डकरे म्हणाल्या, माननीय न्यायमूर्ती शहा यांनी कोल्हापूरला सर्किट बेंच दिले तर महानगरपालिकेतर्फे आम्हीही त्यांच्या पुतळ्यासाठी चबुतरा आणि जागा उपलब्ध करून देऊ. ज्येष्ठ विधिज्ञ व माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, कोल्हापूरला सर्किट बेंच होणार म्हणून गेल्या दोन दिवसांत पुणे-मुंबईतील वकिलांनी उच्च न्यायालयातील कामे घेण्याचे बंद केले आहे. त्यामुळे कोल्हापूरला अंबाबाईच्या कृपेने मुख्य न्यायाधीश शहा यांच्याकडून सर्किट बेंचला मंजुरी मिळणार आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण म्हणाले, जनआंदोलनाच्या रेट्यामुळे सर्किट बेंचचा प्रश्न सुटत आहे. यासाठी एल. एम. चव्हाण, अ‍ॅड. मुळीक यांच्यासह जनतेचे आभार मानायला हवेत. मुख्य न्यायाधीशांनी गोव्यात दिलेल्या शब्दाप्रमाणे सर्किट बेंच स्थापनेसाठी सकारात्मक पावले उचलली तर त्यांचे आभार कोल्हापूरची जनता कायम मानणार आहे. सर्किट बेंचसाठी महापालिकेनेही शेंडा पार्क येथील जागा निश्चित केली आहे. त्यामुळे लवकरच सर्किट बेंच मंजूर होणार आहे. यावेळी अ‍ॅड. श्रेणिक पाटील, अ‍ॅड. डी. डी. घाटगे, अ‍ॅड. संपतराव पवार, आदी वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.माणिक मुळीक यांचे प्रतिपादनमहापालिकेतर्फे चबुतरा आणि पुतळ्यास जागा उपलब्ध करून देऊ : महापौर