दुसऱ्या फेरीतील प्रत्यक्ष प्रवेश निश्चितीच्या पहिल्या दिवशी एकूण २७५ जणांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली. त्यामध्ये विज्ञान शाखेतील २०२, वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या ६३, तर वाणिज्य मराठीच्या ८ आणि कला मराठीच्या दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.
दुसऱ्या फेरीतील आकडेवारी
शाखा प्रवेश क्षमता प्रवेशाची मागणी शिल्लक जागा
कला (इंग्रजी) ५५ २४ ३१
कला (मराठी) २४०४ ६६४ १७४०
वाणिज्य (इंग्रजी) १०२३ १०२३ -
वाणिज्य (मराठी) १८४५ १०३४ ८११
विज्ञान ४१४९ ४१४९ -
एकूण ९४७६ ६८९४ २५८२
फोटो (२११२२०२०-कोल-अकरावी प्रवेश ०१ व ०२) : कोल्हापुरात सोमवारी इयत्ता अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील निवड यादी प्रसिद्ध झाली. त्यानुसार प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विद्यार्थिनी, पालकांनी विवेकानंद महाविद्यालयात गर्दी केली. (छाया : नसीर अत्तार)