शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

राज्य नाट्य स्पर्धा आजपासून

By admin | Updated: November 24, 2015 00:21 IST

१५ संघांचा सहभाग : रात्री दहा वाजता होणार नाटकांचे सादरीकरण

कोल्हापूर : हौशी कलाकारांना कलागुणांच्या सादरीकरणाचे व्यासपीठ असणाऱ्या ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेला आज, मंगळवारी प्रारंभ होणार आहे. या नाट्य स्पर्धेचे उद्घाटन महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते राजर्षी शाहू स्मारक भवनात रात्री साडेनऊ वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी तुकाराम माळी तालीम मंडळाचे ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक सादर होणार आहे. स्पर्धा १० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये १५ संघांचा सहभाग आहे. स्पर्धेतील प्रत्येक नाटकासाठी १५ रुपये तिकीट दर असणार आहे. स्पर्धेतील सहभागी संघांनी सराव करून जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याचे स्पर्धेचे समन्वयक मिलिंद अष्टेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, स्पर्धेतील नाटकांची वेळ सायंकाळी सात वाजता निश्चित केली होती. मात्र, स्पर्धा होणाऱ्या ठिकाणी पूर्वनियोजनानुसार १ ते ७ डिसेंबर या कालावधीत अवि पानसरे व्याख्यानमाला होणार आहे. यामुळे या कालावधीतील नाटकांची वेळ रात्री दहाची करावी लागणार होती. याबाबत सहभागी संघांनी स्पर्धेची एकच वेळ करण्याची मागणी केली. त्यानुसार यंदा स्पर्धेतील सर्व नाटके रात्री दहा वाजता सादर होतील. (प्रतिनिधी)स्पर्धेत सादर होणारी नाटके दिनांकसंस्था, कंसात नाटक २४ नोव्हेंबरतुकाराम माळी तालीम मंडळ(साखर खाल्लेला माणूस) २५ नोव्हेंबरहनुमान तरुण मंडळ (अग्निदिव्य) २६ नोव्हेंबरसुगुण नाट्य संस्था (इच्छा माझी पुरी करा) २७ नोव्हेंबररुद्राक्ष अकॅडमी (डॅडी आय लव्ह यू) ३० नोव्हेंबररंगयात्रा नाट्य संस्था (कदाचित) १ डिसेंबरप्रत्यय नाट्य संस्था (कबीर) २ डिसेंबरप्रतिज्ञा नाट्य संस्था (सुवर्णपदक) ३ डिसेंबरफिनिक्स क्रिएशन्स (नाव झालेच पाहिजे)४ डिसेंबरप्रज्ञान कला अकॅडमी (आला रे राजा) ५ डिसेंबर परिवर्तन कला फौंडेशन (महामृत्युंजय) ६ डिसेंबरनाट्यशुभांगी संस्था (भूलभुलैया) ७ डिसेंबरकुंभी-कासारी बहुउद्देशीय शेतकरी मंडळ (आशानाम मनुष्याणाम) ८ डिसेंबरदेवल क्लब (सूक्ष्म आणि पूर्ण) ९ डिसेंबर भालजी पेंढारकर कला केंद्र (युगांत) १० डिसेंबरअभिरुची संस्था (बळी)