‘निकालाचे वेळापत्रक नसल्याने विद्यार्थी संभ्रम’ या वृत्ताद्वारे ‘लोकमत’ने सोमवारी (दि. ३०) विद्यार्थी आणि पालकांच्या संभ्रमाबाबत लक्ष वेधले. त्यानंतर राज्याच्या सीईटी सेलकडून मंगळवारी राज्य कोट्यातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. एमबीबीएस प्रवेशाची दुसरी फेरी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी वेळापत्रक जाहीर झाल्याने ४५० ते ५२० पर्यंत गुण असलेल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीडीएसला प्रवेश न मिळाल्यास त्यांना बीएएमएसच्या प्रवेशाबाबतचा निर्णय घेणे सोपे होणार आहे. २५० ते ४०० पर्यंत गुण असणाऱ्या, मात्र प्रवेशाची धाकधूक लागलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी १५ टक्के पूर्ण शुल्क भरण्याच्या जागेसाठी अर्ज केला आहे, त्यांना राज्य कोट्यातून संधी मिळाल्यास विद्यार्थी, पालकांचे आर्थिक नुकसान टळणार आहे. आता ५०० ते ५५० गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीडीएसची दुसरी फेरी कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा लागली आहे.
प्रतिक्रिया
राज्य कोट्यातील चॉईस फिलिंग आणि निकालाचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. वेळापत्रकाच्या विषयाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
- अशोक शेट्टी, प्रवेश प्रक्रिया सल्लागार
चौकट
प्रक्रिया अशी राबवावी
पहिल्यांदा एमबीबीएस, बीडीएस आणि त्यानंतर अभिमत विद्यापीठातील एमबीबीएस, बीडीएसनंतर १५ टक्के ऑल इंडिया गव्हर्न्मेंट आयुष, ७० टक्के राज्य कोटा आणि अखेरच्या टप्प्यात १५ टक्के खासगी आणि इन्स्टिट्यूट, मॅनेजमेंट कोटा अशा प्रवेश फेरी झाल्यास विद्यार्थी, पालकांचा गोंधळ होणार नाही. पुढील वर्षी तरी अशा पद्धतीने शासनाने प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी सूचना प्रवेश प्रक्रिया सल्लागार अमोल सूर्यवंशी यांनी केली.
वेळापत्रक असे
चॉईस फिलिंग भरणे - ३ ते १० डिसेंबर
पहिल्या फेरीच्या जागा वाटपाची घोषणा - १२ डिसेंबर
विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करणे - १३ ते २१ डिसेंबर
फोटो (०३१२२०२०-कोल-मेडिकल न्यूज)