शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय शाहू मॅरेथॉन स्पर्धा ३१ ला

By admin | Updated: January 3, 2016 00:38 IST

प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेचा दर्जा : ‘जागे व्हा पंचगंगेसाठी’ ‘मोकळा करा पंचगंगेचा श्वास,..... ’ हे घोषवाक्य

कोल्हापूर : ‘समता, साक्षरता व क्रीडा विकास’ हा राजर्षी शाहूंचा विचार युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी बिनखांबी गणेश मित्रमंडळातर्फे आयोजित शाहू मॅरेथॉन स्पर्धा यंदा ३१ जानेवारीला सकाळी सहा वाजता होणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने ‘जागे व्हा पंचगंगेसाठी’- ‘मोकळा करा पंचगंगेचा श्वास, मग धरा स्मार्ट सिटीचा ध्यास’ हे घोषवाक्य घेऊन प्रबोधन केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष किसन भोसले व कार्याध्यक्ष द्वारकानाथ नायडू यांनी पत्रकार परिषदेत दिली. भोसले म्हणाले, यंदा या मॅरेथॉन स्पर्धेचे २२ वे वर्ष असून, बिनखांबी गणेश मंदिर येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेला यंदा महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनने प्रथमच राज्यस्तरीय स्पर्धेचा दर्जा दिला आहे. खुल्या पुरुष गटासाठी २१.२ किलोमीटर, तर खुल्या महिला गटासाठी १० किलोमीटर असा टप्पा आहे. तसेच शालेय मुले व मुली वयोगट १४ ते १७, १२ वर्षांखालील मुले व मुली गट, प्रौढ गट ४५ ते ५५, ६५ वर्षांवरील प्रौढ गट व ४५ वर्षांवरील महिला गट, १० वर्षांवरील मुले, मुली अशा विविध गटांत स्पर्धा होणार आहे. याशिवाय खास दिव्यांग (अंध) गटासाठी फन रन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण एक लाख साठ हजार रुपयांची रोख व स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. यंदाही स्पर्धेत एकूण पाच हजारांहून अधिक धावपटू सहभागी होतील, अशी अपेक्षा संयोजकांना आहे. इच्छुकांनी मंडळाच्या बिनखांबी गणेश मंदिर चौकातील कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांतर्फे केले आहे. १४, १७ व १० आणि १२ वयोगटातील स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश मोफत आहे. यावेळी सचिव प्रताप घोरपडे, विजय सासने, अरुण सावंत, धीरज पाटील, संजय सातपुते, नरेंद्र इनामदार, बाळासाहेब कडोलकर, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव आर. डी. पाटील, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष एस. व्ही. सूर्यवंशी, एम. वाय. पाटील, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र सावंत, आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी)