या मेळाव्यात राज्यातील खासगी उद्योजक सहभागी होणार असून मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या संकेतस्थळावर लाॅगीन करावी. त्यात शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावा. पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ मोबाईल संदेशाव्दारे कळविले जाणार आहे. शक्य असेल तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन केले जाणार आहे, तरी इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त स. कृ. माळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
राज्यस्तरीय महारोजगार मेळावा १२ ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST