शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दूध अनुदान वाढविले, पण माहिती भरण्याचे लॉगिनच बंद; राज्य सरकारचा सावळागोंधळ 

By राजाराम लोंढे | Updated: November 28, 2024 13:11 IST

बटर वधारले, पण ‘जीएसटी’ने परवडेना

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य सरकारने गाय दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर सात रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली; पण अनुदानाची माहिती भरण्याचे लॉगिनच गेले महिनाभर बंद आहे. सप्टेंबरपर्यंतची माहिती भरली असून, ३० नोव्हेंबरला योजना संपणार आहे. आतापर्यंत ३६० कोटींचे अनुदान राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाटप केले असून, अजून किमान ५०० कोटींची गरज आहे.गेले एक वर्ष गाय दुधाचे उत्पादन वाढले आणि मागणी कमी असल्याने दर घसरले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान दिले. उन्हाळा असूनही दुधाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे जुलैपासून प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान दिले. निवडणुकीच्या तोंडावर ऑक्टोबरपासून सात रुपये अनुदान केले.

जुलै ते सप्टेंबरपर्यंतची दूध उत्पादकांची माहिती भरली आहे. त्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. या कालावधीतील गाय दुधाचे संकलन पाहता किमान ८५० कोटी रुपये अनुदानापोटी लागणार आहेत. त्याशिवाय ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचे पैसे राहणार आहेत. मात्र, या दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सरकारचे लॉगिनच बंद आहे.अनुदान मिळते म्हणून संघांकडून दरकपातराज्य सरकारने गाय दुधाला प्रतिलिटर पाच वरून सात रुपये अनुदान जाहीर केले आणि राज्यातील दूध संघांनी गाय खरेदी दरात तीन रुपयांची कपात केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पावडर २३५ रुपयांवरआंतरराष्ट्रीय पातळीवर गाय दूधपावडरीचा वधारला आहे. हा दर प्रतिकिलो २३० ते २३५ रुपये किलोपर्यंत आहे. मात्र, देशांतर्गत बाजारपेठेत अद्याप २१० रुपयांपर्यंतच दर आहे.

बटर वधारले, पण ‘जीएसटी’ने परवडेनागाय व म्हैस बटरच्या दरांत वाढ होत आहे. सध्या गायीचे ३९० रुपये, तर म्हशीचा ४०० रुपयांच्या पुढे दर मिळत आहे. पण, त्यासाठी दूध संघांना तब्बल १२ टक्के जीएसटी द्यावा लागत असल्याने किलोमागे जीएसटीपोटी ४७ ते ४८ रुपये जात असल्याने सहकारी संघांची अडचण झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmilkदूधGovernmentसरकार