शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबरपर्यंत लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 13:44 IST

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत राज्यातील २२ हजार संस्था निवडणूकीस पात्र असून डिसेंबर अखेर आणखी तीन हजार संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका डिसेंबरपर्यंत लांबणीवरकोरोनामुळे तिसऱ्यांदा मुदतवाढ : २२ हजार संस्था निवडणूकीस पात्र

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने राज्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका ३१ डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आतापर्यंत राज्यातील २२ हजार संस्था निवडणूकीस पात्र असून डिसेंबर अखेर आणखी तीन हजार संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे.सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपण्यापुर्वी निवडणूका घेणे बंधनकारक आहे. सहकारी निवडणूक प्राधीकरणाकडून सध्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंत काही संस्थांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू होती, मात्र महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने निवडणूका एप्रिल २०२० पर्यंत लांबणीवर टाकल्या होत्या.

मार्च मध्येच कोरोनाचे संकट आल्याने मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणूका घेता येईना. त्यामुळे राज्य शासनाने १८ मार्चला अध्यादेश काढून १७ जून २०२० पर्यंत सर्वच निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. जून मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत राहिल्याने १७ सप्टेंबर पर्यंत तीन महिन्याची मुदतवाढ दिली.

सध्या निवडणूका घेण्यासारखे वातावरण नसल्याने शासनाने पुन्हा मुदतवाढ दिली असून आता ३१ डिसेंबर पर्यंत मुदत संपलेल्या संस्थांचे संचालक मंडळ कायम राहणार आहे. याबाबतचा अध्यादेश सोमवारी राज्य शासनाने काढला आहे.९७ व्या घटनादुरूस्तीनुसार एखाद्या संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर त्यांना जास्तीत जास्त एक वर्ष मुदतवाढ देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२० ही अंतिम मुदतवाढ असू शकते. त्यानंतर द्यायची झाली तर कायद्यात दुरूस्ती करावी लागणार आहे.

मध्यंतरी राज्य मंत्रीमंडळामध्ये याबाबत चर्चाही झाली होती. मात्र आणखी तीन महिन्याचा कालावधी आहे, तोपर्यंत जर कोरोनाचे संकट कमी झाले तर निवडणूका घेता येऊ शकतात. त्यामुळे कायद्यात दुरूस्ती करण्याऐवजी पुन्हा मुदतवाढ दिली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सहकारी संस्था-

  • दूध संस्था - १५००
  • विकास संस्था - ९२२
  • नागरी बँका - २२
  • पतसंस्था - ५५
  • साखर कारखाने - ४

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर