गडमुडशिंगी हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील बहुसंख्य लोकवस्तीचे गाव असून, ते जिल्हा परिषद मतदारसंघाच्या केंद्रस्थानी आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण चालू आहे. परंतु, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र मंजूर नसल्यामुळे भागातील नागरिकांना शहर परिसरात लसीकरणासाठी धाव घ्यावी लागत आहे. लॉकडाऊन निर्बंधामुळे अडचणीत भर पडली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाची मोहीम सुरू करून द्यावी, अशी मागणी नागरिकांतूनही जोर धरू लागली आहे.
फोटो ओळ- आरोग्य प्रशासनाने गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण केंद्र सुरू करावे या मागणीचे निवेदन करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे व रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संतोष कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.