शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

‘जय भवानी, जय शिवाजी’ जयघोष, शिवमहोत्सवाला प्रारंभ, वातावरण शिवमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:23 IST

कोल्हापुरात १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती महोत्सवाला शनिवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, छत्रपती शिवरायांचे पोवाडे, फडफडणाऱ्या भगव्या झेंड्यांसह हलगीच्या कडकडाटवर घुमणाऱ्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वातावरण शिवमय झाले आहे. मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठेत सलग आठवडाभर विविध कार्यक्रमांनी शिवोत्सव रंगणार आहे.

ठळक मुद्दे उभा मारुती चौकात अश्वारूढ शिवपुतळ्याचे दिमाखात आगमन मिरजकर तिकटी चौकात भव्य प्रवेशद्वार सजले

कोल्हापूर : कोल्हापुरात १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती महोत्सवाला शनिवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, छत्रपती शिवरायांचे पोवाडे, फडफडणाऱ्या भगव्या झेंड्यांसह हलगीच्या कडकडाटवर घुमणाऱ्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी वातावरण शिवमय झाले आहे. मंगळवार पेठ आणि शिवाजी पेठेत सलग आठवडाभर विविध कार्यक्रमांनी शिवोत्सव रंगणार आहे.शिवाजी तरुण मंडळाच्या अश्वारूढ शिवपुतळ्याची मिरवणूकशिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था, तरुण मंडळे एकत्र येऊन शिवाजी तरुण मंडळाच्या पुढाकाराने पेठेचा मध्य असणाऱ्या उभा मारुती चौकात शिवजयंती साजरी केली जात आहे. त्यानिमित्त चौकात भव्य अशी गडकिल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे.

शनिवारी सकाळी दसरा चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले. तेथे आमदार चंद्रकांत जाधव, पोलीस निरीक्षक अनिल गुजर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, उत्सव कमिटी अध्यक्ष रोहीत मोरे, सुरेश जरग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून अश्वारूढ पुतळ्याचे स्वागत करण्यात आले.

यावेळी ‘जय भवानी - जय शिवाजी’ असा जयघोष करीत, हलगीच्या ठेक्यावर मंडळाचे तिरंगी तसेच भगवे झेंडे फडफडवीत दसरा चौकातून दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅली बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौकापासून उभा मारुती चौकापर्यंत काढण्यात आली.या दुचाकी रॅलीमध्ये आमदार जाधव यांच्यासह सुरेश जरग, प्रताप देसाई, तुळशीदास राऊत, सुनिल राऊत, प्रसाद इंगवले, लाला गायकवाड, चंद्रकांत यादव, केशवराव जाधव, सुरेश गायकवाड, श्रीकांत भोसले, कृष्णात चव्हाण, सदाशिव यादव, आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी शाहीर कृष्णात पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे व शिवचरित्र यावर ऐतिहासिक पोवाडा सादर केला. या पोवाडा कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर