शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

गृहस्वप्न साकारण्याची ‘दालन’मध्ये चांगली संधी-परवडणाऱ्या घरांसाठी नोंदणीचा प्रारंभ-थेट संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:41 IST

‘क्रिडाई कोल्हापूर’ या संघटनेतर्फे ‘दालन’ गृहप्रदर्शन आज, शुक्रवारपासून कोल्हापुरात सुरू होणार आहे. प्रदर्शनाची संकल्पना, बांधकाम क्षेत्राची सद्य:स्थिती व अडचणी, संघटनेचे उपक्रम याबाबत ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव यांच्याशी साधलेला थेट संवाद...

‘क्रिडाई कोल्हापूर’ या संघटनेतर्फे ‘दालन’ गृहप्रदर्शन आज, शुक्रवारपासून कोल्हापुरात सुरू होणार आहे. प्रदर्शनाची संकल्पना, बांधकाम क्षेत्राची सद्य:स्थिती व अडचणी, संघटनेचे उपक्रम याबाबत ‘क्रिडाई’चे अध्यक्ष महेश यादव यांच्याशी साधलेला थेट संवाद...प्रश्न : ‘दालन’ प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत काय सांगाल?उत्तर : पूर्वी ‘पीबीएके’ नावाने बांधकाम व्यावसायिकांची संघटना कार्यरत होती. बांधकाम प्रकल्प या क्षेत्रातील आवश्यक ती माहिती ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सन १९८२ पासून ‘दालन’ प्रदर्शनाची संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. प्रारंभी १५ ते ३० स्टॉल्स्वरून सुरुवात झालेले प्रदर्शन आज पश्चिम महाराष्ट्राची वेगळी ओळख बनले आहे. दर तीन वर्षांनी ‘दालन’ आयोजित केले जाते. ‘क्रिडाई कोल्हापूर’तर्फे आता यावर्षी १0 वे ‘दालन’ होत आहे. यंदा १६० स्टॉल्स् असणार आहेत. पुणे ते बंगलोर या टप्प्यामध्ये होणारे हे सर्वांत मोठे प्रदर्शन आहे. ज्या उद्देशाने आम्ही हे प्रदर्शन सुरू केले, ते साध्य होत असल्याचे समाधान आहे. यावर्षी ‘दालन’मध्ये परवडणाºया दरातील सुमारे २००० घरांसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

प्रश्न : बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी काय व्हावे?उत्तर : राज्य शासनाच्या नगररचना विभागाने सर्वांत पहिल्यांदा ‘ड’ वर्ग नियमावलीची दुरुस्ती केली पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांनी प्रकल्पांची नोंदणी केली आहे, त्यांच्यासाठी १००० रुपयांची स्टॅम्प ड्युटी असून, ती सर्वांसाठी लागू व्हावी. एलबीटी गेल्यानंतर शासनाने एक टक्का एलबीटी सेस हा नोंदणीवेळी लागू केला. आता जीएसटी असल्याने हा एलबीटी सेस रद्द व्हावा. टर्न टेबल लॅडरची उपलब्धता व्हावी. ‘बी’ टेन्युअरचा विषय मार्गी लागावा. यूएलसी रद्द व्हावी. भाडेतत्त्वावरील मिळकतींचा घरफाळा कमी व्हावा. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार काम सुरू व्हावे. 

प्रश्न : बांधकाम क्षेत्राची स्थिती कशी आहे ?उत्तर : कोल्हापूरमध्ये ‘क्रिडाई कोल्हापूर’च्या सदस्यांचे सुमारे ७०, तर सदस्य नसलेल्या बांधकाम व्यावसायिकांचे ४० प्रकल्प सुरू आहेत. त्यांच्या माध्यमातून सुमारे १२०० फ्लॅटचे काम सध्या सुरू आहे. ‘दालन’मध्ये यावर्षी नव्या सुमारे २००० फ्लॅटची नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाºया घरांचा कारपेट एरिया ३० आणि ६० स्क्वेअर फूट आहे. परवडणाºया घरांचे मार्केट चांगले आहे. या स्वरूपातील सुमारे २५ हजार घरांची मागणी आहे. किमान १५ लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंतचे फ्लॅट सध्या कोल्हापुरात उपलब्ध आहेत. काहींचे काम सुरू आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. स्लॅब, बीम, आदी कंपनीतून तयार स्वरूपात आणून ते प्रकल्पाच्या ठिकाणी केवळ जोडण्याचे काम होते. या तंत्रज्ञानामुळे १५ ते १६ मजल्यांची इमारत सहा महिन्यांमध्ये पूर्ण होऊ शकते. ‘रेरा’ कायद्याचे ‘क्रिडाई कोल्हापूर’ने स्वागत केले आहे. हा कायदा चांगला आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकाचा अभ्यास आहे, ज्यांच्याकडे तंत्रज्ञानपूर्ण साधनसामग्री आहे, असे व्यावसायिकच या क्षेत्रात टिकून राहिले आहेत. प्रकल्प सुरू होतानाच त्याच्या पूर्णत्वाची माहिती द्यावी लागत असल्याने ग्राहकांनादेखील विश्वास मिळाला आहे. ‘रेरा’अंतर्गत कोल्हापुरात २२५ प्रकल्पांची नोंदणी झाली आहे. शासनाच्या सूचनेनुसार क्रिडाई कोल्हापूरने ‘रेरा’बाबत कन्सेल्शन फोरम सुरू केला आहे. 

प्रश्न : कोल्हापुरातील संधीबाबत काय सांगाल ?उत्तर : मुंबई, पुण्यानंतर घर अथवा कार्यालयासाठी गुंतवणुकीसाठी कोल्हापूर हे चांगले ठिकाण आहे. विमानसेवेचा प्रश्न मार्गी लागत आहे. आयटी कंपन्यांसाठी लागणारे मनुष्यबळ मुबलक स्वरूपात आणि कमी पैशांमध्ये येथे उपलब्ध आहे; त्यामुळे कोल्हापुरात येणाºया आयटी कंपन्यांची संख्या वाढत आहे. परवडणाºया घरांबाबत केंद्र आणि राज्य सरकारचे सकारात्मक धोरण, यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात बांधकाम क्षेत्रासाठी सरकारने केलेल्या तरतुदींचादेखील कोल्हापूरला फायदा होणार आहे. 

प्रश्न : ‘क्रिडाई कोल्हापूर’चे भविष्यातील उपक्रम काय आहेत?उत्तर : बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न, अडचणी सोडविण्यासह सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम ‘क्रिडाई कोल्हापूर’ नेहमीच करते. सैन्यदलाच्या भरतीसाठी येणाºया युवकांसाठी जेवणाची व्यवस्था, रस्ते विकास प्रकल्पांतर्गत लावलेल्या झाडांना पाणी देण्याचे काम केले आहे. शहर स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या मोहिमेत आमचा सहभाग आहे. अयोध्या टॉकीज ते विल्सन पूल हा रस्ता आम्ही चांगल्या पद्धतीने विकसित करणार आहोत. संघटनेच्या स्वत:च्या जागेमध्ये भव्य संकुल उभारण्याचे आमचे ध्येय आहे. या संकुलामध्ये नवोदित अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध चर्चासत्रे, परिषदासाठी सभागृह, बांधकामासाठीच्या काँक्रीट, विटा, आदी साहित्याच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा, आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कोल्हापुरात परवडणाºया सुमारे २५ हजार घरांचे बांधकाम ‘क्रिडाई कोल्हापूर’चे सदस्य करणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर