शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे वर्षांपूर्वीचा वाडा उतरण्यास प्रारंभ

By admin | Updated: August 7, 2016 00:58 IST

धोकादायक भाग उतरणार : १९ इमारती पाडणार; महापालिकेची पोलिस बंदोबस्तात कारवाई

कोल्हापूर : गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दोन घरांच्या भिंती कोसळून घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मालक आणि कूळ वादातून न्यायप्रक्रियेत अडकलेल्या धोकादायक स्थितीतील १९ इमारती उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यापैकी महाद्वार रोड चौकातील गोसावी वाड्याची भव्य तीन मजली इमारत उतरण्यास प्रारंभ केला. विशेष म्हणजे, मालकांचा विरोध न जुमानता पोलिस बंदोबस्तात या इमारतीचा धोकादायक भाग उतरण्यात येत आहे.सुमारे १९ इमारती या कूळ आणि मालक वादामुळे गेली अनेक वर्षे न्यायप्रक्रियेत अडकल्या आहेत. त्यामुळे त्या इमारती अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत, पण या इमारतीला धोका पोहोचल्यास त्यासाठी पुढील जबाबदारी महापालिकेवर येते तसेच त्यामध्ये दुर्घटना घडल्यास नाहक बळी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा इमारतींबाबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी अशा इमारतींचा धोकादायक भाग उतरण्याबाबत सूचना केल्या. त्या पार्श्वभूमीवर महाद्वार रोडवरील महाद्वार चौकापासून अंबाबाई मंदिरपर्यंत असणाऱ्या प्रसिद्ध गोसावी वाड्याचे तिसऱ्या मजल्यावरील धोकादायक बांधकाम उतरण्यास प्रारंभ केला. अंबाबाई मंदिरानजीक महाद्वार रोड चौकात गोसावी वाडा सुमारे ३०० वर्षांपूर्वीचा असून तो अरुण राघवगिरी गोसावी वगैरे ६ जणांच्या नावावर आहे, तर या प्रसिद्ध वाड्यात १३ कुळे पूर्वीपासून आहेत. या इमारतीबाबत मालक आणि कूळ असा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. ही धोकादायक इमारत उतरण्यासाठी महापालिकेचे पथक आल्यानंतर मालकांनी त्यास विरोध करून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठीच्या जिन्याला कुलूप लावून अडथळा आणला. अखेर दुपारनंतर पोलिस यंत्रणा आल्यावर मालकांनी कुलूप काढले व बंदोबस्तात इमारतीचा धोकादायक भाग पाडण्यास प्रारंभ केला. ही कारवाई करताना काही वेळ महाद्वार रोड, तर पूर्ण दिवस अंबाबाई मंदिराचे महाद्वार प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद ठेवले होते.