कोल्हापूर : शहरातील सर्व कोविड केंद्र तसेच व खासगी रुग्णालयात स्थानिक रुग्णांना जागा राखून ठेवाव्यात तसेच दुधाळी सह विभागीय कोविड केंद्रे सुरू करावीत अशी मागणी गुरुवारी शिवसेना शुक्रवार पेठ उत्तरेश्वर पेठ शाखेच्या वतीने प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे या सर्व रुग्णांना अत्याधुनिक चांगले व योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रशासनासह आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पाहिली तर जिल्ह्याबाहेरील उपचार घेणाऱ्यांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटर बेडवर परराज्यातील रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा आणि आता सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्नाटक सह लगतच्या जिल्ह्यातील रुग्ण शहर व जिल्ह्यात येत असून माणुसकीच्या दृष्टीने आपण त्यांचेवर उपचार करत आहोत. पण शहरात रुग्णसंख्या वाढत असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी विभागीय दुधाळी, फुलेवाडी, गांधी मैदान, राजेपाध्ये नगर, कसबा बावडा, त्या सर्व विभागात ऑक्सिजन बेड असलेली प्रशिक्षित डॉक्टर स्टाफ सह अत्याधुनिक कोविड सेंटर त्वरित सुरू करावीत, असे निवेदनात म्हटले आहे.
शहरातील सर्व खासगी व महापालिकेच्या वतीने सुरू असणाऱ्या कोविड सेंटरमध्ये स्थानिक रुग्णांना प्राधान्याने उपचार करण्यासाठी खाटा राखीव ठेवाव्यात. शहरातील एकही कोरोना रुग्ण बेड अभावी हेळसांड होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरातील सर्व खासगी व महापालिकेच्या वतीने सुरू असणाऱ्या कोविड सेंटरमध्ये स्थानिक रुग्णांना प्राधान्याने उपचार करण्यासाठी खाटा राखीव ठेवाव्यात. शहरातील एकही कोरोना रुग्ण बेड अभावी हेळसांड होऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी किशोर घाटगे, सुरेश कदम, रियाज बागवान ,सनी अतिग्रे, राकेश पोवार ,अनंत पाटील उपस्थित होते