शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 15:46 IST

डोंगररांगांतून वाहणारे धुके, मंद वारा, सोबतीला ऊन-पावसाचा खेळ, हिरव्यागार निसर्गाच्या संगतीत गुलालाची उधळण, तोंडी यमाईदेवी, चोपडाईदेवी, काळभैरव, व जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात सोमवारी जोतिबा डोंगर येथे नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ झाला.

ठळक मुद्देजोतिबाच्या नावानं चांगभलंचा जयघोषनगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ, दीड लाखाच्यावर भाविकांची हजेरी

जोतिबा : डोंगररांगांतून वाहणारे धुके, मंद वारा, सोबतीला ऊन-पावसाचा खेळ, हिरव्यागार निसर्गाच्या संगतीत गुलालाची उधळण, तोंडी यमाईदेवी, चोपडाईदेवी, काळभैरव, व जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात सोमवारी जोतिबा डोंगर येथे नगरप्रदक्षिणा (दिंडी) सोहळयास प्रारंभ झाला.

वीणा, टाळ, मृदंग, ढोल, सनई, तसेच भजन-कीर्तनाच्या तालात प्रदक्षिणेसाठी दीड लाखाच्यावर भाविकांनी हजेरी लावली. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ही नगरप्रदक्षिणा काढली जाते.जोतिबा डोंगराभोवतालची बारा ज्योतिर्लिंगे व अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी भाविक प्रदक्षिणेत सहभागी होतात. रविवारपासूनच नगरप्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून भाविक दाखल झाले होते.सोमवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी झाले. अभिषेक व श्रींच्या अलंकारिक पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता चांगभलंचा अखंड जयघोष झाला, त्यानंतर दिंडी मुख्य मंदिरातूत दक्षिण दरवाजातून गजगतीने मार्गस्थ झाली.सकाळी दहा वाजता दिंडी गायमुख तलाव येथे आली. तेथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाले. त्यानंतर भाविकांनी तेथील हनुमान मंदिरात दर्शन घेतले. दिंडी पुन्हा मार्गस्थ झाली. साडेअकरा वाजता दिंडी जोतिबा कोल्हापूर मार्गावरील भीमाशंकरजवळ आली. तेथून ती नंदीवन, आंबावन, पानखंड, नागझरी, मंडोपतीत, व्याघराई तीर्थ, तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन दिंडी मुरागुळा येथे आली.

मुरागुळात झिम्मा फुगडीने रंगत आणली. काहींनी भजनांचे सूर व जोतिबाची भक्तिगीते गायिली. येथे चहा, केळी, शाबूदाणा, राजिगरा लाडूचे वाटप झाले. दिंडी पुन्हा जमनाचीवाडी (दानेवाडी) सरकाळामार्गे गिरोली (ता. पन्हाळा) येथे आली. तेथील श्री निनाई मंदिरात विविध धार्मिक विधी व आरती झाली. येथेच एक दगडावर शिवारामध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत. तेथे भाविकांनी दर्शन घेतले..सहज सेवा ट्रस्टतर्फे खिचडीसहज सेवा ट्रस्टतर्फे गायमुख तलाव येथे भाविकांना शाबू खिचडी, केळी, चहाचे वाटप केले. तसेच जोतिबा डोंगरावर धसडाचे खळे येथे काही शेतकऱ्यांनी चहा वाटप केले. मुरागुळा, गिरोली येथेही चहा, राजिगरा लाडू, खिचडी, केळीचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Jyotiba Chaitra Yatra 2018ज्योतिबा चैत्र यात्रा २०१८kolhapurकोल्हापूरReligious programmeधार्मिक कार्यक्रम