शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू , चिकुनगुणियाचा प्रभाव रोखण्यासाठी पथके, उपाययोजना निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 15:44 IST

कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत डेंग्यू व चिकुनगुणिया यासंदर्भात सर्वेक्षण करण्याकरिता पथके स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देडेंग्यू , चिकुनगुणियाचा प्रभाव रोखण्यासाठी पथकेउपाययोजना निश्चित : महापालिका व जिल्हा हिवताप कार्यालयाची बैठक

कोल्हापूर : महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत डेंग्यू व चिकुनगुणिया यासंदर्भात सर्वेक्षण करण्याकरिता पथके स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

दैनंदिन सर्वेक्षणाद्वारे अळीनाशकाचा वापर करून शहरात डेंग्यूची व चिकुनगुणियाची होणारी वाढ कशी रोखता येऊ शकते याबद्दल या बैठकीत नियोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी होते. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी एम. जी. वड्ड उपस्थित होते.डेंग्यू, चिकुनगुणिया रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरातील पाणीसाठे आठवड्यातून एक वेळा स्वच्छ घासूनपुसून मगच पाणी भरावे. पाणीसाठ्यांना झाकण असावे, घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील फ्रिजच्या पाठीमागील बाजूचे ट्रे आठवड्यातून एक वेळ स्वच्छ करावेत; टायर, नारळाच्या करवंट्या, फुटक्या बादल्या, भंगाराचे साहित्य नष्ट करावे, फुलझाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. घराच्या छतावर तसेच बेसमेंटमध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.नागरिकांनी दक्षता घेतली तर डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होणार आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरूपी पाणीसाठे आहेत, तिथे गप्पी मासे सोडावेत, महानगरपालिकेमार्फत दैनंदिन धूरफवारणी सुरू ठेवावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यास तत्काळ महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांना कळविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर