शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

बावडा पॅव्हेलियन बनतेय स्पोर्टस् हब : सतेज पाटील यांच्या फंडातून ५0 लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 01:04 IST

स्थानिक नागरिक, राजकीय पदाधिकारी आणि महानगरपालिका यांची योग्य साथ मिळाल्यास एखाद्या मैदानाचे कसे कायापालट होते, हे चित्र कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाकडे

ठळक मुद्देफिरण्यासाठी येणारे नागरिक आणि खेळाडूंनी पुढाकार घेऊन मैदानाचा कायापालट केला. मैदान म्हणजे तळीरामाचा अड्डाच होता. तो हटविण्याची मोहीम नागरिकांनी घेतली आणि या गोष्टीला आळा घातला.

कोल्हापूर : स्थानिक नागरिक, राजकीय पदाधिकारी आणि महानगरपालिका यांची योग्य साथ मिळाल्यास एखाद्या मैदानाचे कसे कायापालट होते, हे चित्र कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाकडे पाहून कळते. पूर्वी नाममात्र असलेले मैदानाचे स्वरूप आता बदलून स्पोर्टस् हब म्हणून ओळखू लागले आहे.

महानगरपालिकेच्या हद्दीत असलेला, पण अजून ग्रामीण भागाशी असलेली नाळ न सोडलेला परिसर म्हणजे कसबा बावडा होय. येथील नागरिकांसाठी बावडा पॅव्हेलियन हे एकमेव खेळण्यासाठी व फिरण्यासाठी मैदान आहे. येथे नियमित सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक आणि खेळाडूंनी पुढाकार घेऊन मैदानाचा कायापालट केला. त्याला साथ मिळाली ते आमदार सतेज पाटील यांची.

आमदार पाटील यांनी आपल्या फंडातून सुमारे ५0 लाख रुपयांचा निधी कसबा बावडा पॅव्हेलियनसाठी उपलब्ध करून दिला. नगरसेवकांनीही पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या वतीने निधी दिल्याने या मैदानाचा कायापालट होत आहे. मैदान म्हणजे तळीरामाचा अड्डाच होता. तो हटविण्याची मोहीम नागरिकांनी घेतली आणि या गोष्टीला आळा घातला. तसेच मैदान सपाटीकरणासह विविध सुशोभीकरणासाठी ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.

मैदानात एका बाजूला पावसाचे पाणी साठून दलदल होत असल्याने खेळाडू घसरून पडून त्यांना इजा होत होती. ती कमी करण्यासाठी मैदानात अंतर्गत गटारी बांधण्यात आली आहे. क्रिकेटसाठी तीन चांगले पिचही करण्यात येत आहेत. यासह मंडईच्या पाठीमागील बाजूला असलेली प्रेक्षक गॅलरी करण्यात आली आहे.यासह पॅव्हेलियनसमोर मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. बक्षीस समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. यासह मैदानात बास्केट बॉल आणि महाराष्ट्र हायस्कूलमागे लॉन टेनिसचे मैदान तयार करण्यात आले आहे. ज्येष्ठांना बसण्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी लहान बाग तयार करण्यात आली आहे. तसेच मैदानाच्या काही भागांसाठी वॉकिंग ट्रॅकही तयार करण्यात आले आहेत. यासह ओपन जिम तयार असल्याने ते ज्येष्ठांच्या सोईसाठी झाले आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी हॉलचे काम या ठिकाणी होणार आहे.

मैदानाजवळ असलेल्या पॅव्हेलियनमध्ये वूडन बॅटमिंटन कोर्ट आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व बॅच हाऊसफुल्ल असतात, हे एक वेगळे वैशिष्ट्ये म्हणता येईल. तसेच अद्ययावत व्यायामशाळाही आहे. माफक दरामध्ये या ठिकाणी व्यायामाचे साहित्य उपलब्ध होत असल्याने सकाळी व सायंकाळी दोन्ही सत्रांत व्यायाम करण्यासाठी मोठी गर्दी असते. पॅव्हेलियनच्या वरील मजल्यावर बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच मैदाने बंदिस्त करून मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेट लावावे, जेणेकरून येणाºया दुचाकी व चारचाकी गाड्या मैदानात प्रवेश करणार नाहीत. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.नियमित झाडांना पाणीमैदानात सभोवती येथे नियमित फिरण्यासाठी येणारे खेळाडू व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. याला नियमित पाणी घालण्याचे काम हे नागरिक करतात; त्यामुळे ही झाडे मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. 

कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान उत्कृष्ट झाले आहे.मध्यभागी क्रिकेटची खेळपट्टी चांगली आहे; मात्र या खेळपट्टीचा वापर आता सरावासाठी करू लागल्याने ती लवकर खराब होण्याची शक्यता आहे; त्यामुळे सरावासाठी बाजूच्या जागेचा वापर करावा.- सरदार पाटील, कसबा बावडाकसबा बावड्यातील तरुणांना खेळण्यासाठी पॅव्हेलियन हे एकमेव मैदान आहे. देखभाल-दुरुस्तीमुळे मैदान आता अधिक चांगले झाले आहे; मात्र मैदान आता सभोवती बंदिस्त करावे. मैदानाच्या पश्चिमेकडील बाजूस वृक्षारोपण करावे.- दिलीप मोरे, कसबा बावडा 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKhelo India 2019खेलो इंडिया 2019